अस झाल तर वॉईन शॉप, दारुची दुकाने बंद करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा !!

अस झाल तर वॉईन शॉप, दारुची दुकाने बंद करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा !!

 तर वॉईन शॉप, दारुची दुकाने बंद करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा !!!

मुंबई :राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने निर्बंध लागू केले आहेत. राज्यात सध्या लागू करण्यात आलेले निबंध हे मोठ्या स्वरुपाचे आहेत. रुग्णसंख्या कितीही वाढली तरी जोपर्यंत ऑक्सिजन आणि रुग्णालयांतील खाटांची मागणी एक निर्धारित मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत हे निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नाही.

किंबहुना याच राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात येईल अशी आशा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. ते मुंबईत बोलत होते. राजेश टोपे म्हणाले, सध्या राज्यातील ऑक्सिजनची मागणी 270 मेट्रिक टनावरुन 350 मेट्रिक टन इतकी झाली आहे. मात्र, हे कोव्हिड आणि नॉन-कोव्हिड रुग्णांसाठी लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनचे प्रमाण आहे. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण दिवसाला लागणाऱ्या 1700 ते1800 मेट्रिक टनची मागणी पूर्ण केली आहे. सध्यारुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना कमी प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागत आहे. त्यावरुन सध्याचा कोरोना विषाणू सौम्य वाटत असल्याचे टोपे यांनी म्हटले.

वाईन शॉप, दारुची दुकाने बंद करणार सरकारला क्लासपेक्षा (शाळा) ग्लासची जास्त चिंता आहे, अशी टीका भाजपने केली होती.

या टीकेला उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले, गर्दी होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी राज्य सरकार निर्बंध लावणार आहे. त्यामुळे वाईन शॉप आणि दारूच्या दुकानांमध्ये गर्दी होत असेल तर तीदेखील बंद केली जातील, असेही टोपे यांनी सांगितले.

तर सरकार योग्य ती काळजी घेईल कोरोनामुळे लहान मुलांना डायबेटिस होण्याचे प्रमाण वाढत असल्याबद्दल

आयसीएमआरने (ICMR) कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत.

केंद्र सरकारकडून तशा सूचना आल्यास राज्य सरकार योग्य ती काळजी घेईल असेही टोपे यांनी स्पष्ट केले .