राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या नियमांना धाब्यावरती बसून स्थानिक अधिकाऱ्यांना लाच देऊन देशी विदेशी मद्य विक्री जोरात चालू

राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या नियमांना धाब्यावरती बसून स्थानिक अधिकाऱ्यांना लाच देऊन देशी विदेशी मद्य विक्री जोरात चालू

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांनाधाब्यावर बसून स्थानिक अधिकाऱ्यांना लाचं देऊन कागदोपत्री परमिट रूम दाखवुन ओपन स्पेस मध्ये देशी विदेशी मद्यविक्री जोरात सुरु..... 

       सविस्तर हकीकत अशी की अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे हॉटेल दीपक असून नेवासा तालुक्यातील 

नगर औरंगाबाद 

महामार्गावर, मौजे प्रवरासंगम येथे गट न. 146/1 न तेथे बोगस बांधकाम परवानगीच्या आधारे परमिट रूम लायसन्स मंजूर केले आहे.

वस्तुस्थिती अशी की, नगर रचना विभाग अहमदनगर यांच्याद्वारे सदर जागेवर 115 मीटर अंतर सोडून बांधकाम परवानगी मंजूर करण्यात आली होती. पण सदर परवानगीच्या विपरीत, हॉटेलचे बांधकाम महामार्ग लगत अगदी 15 मीटर वर करण्यात आले आणि सदर ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाज घेऊन कागदोपत्री परमिट रूम लायसन्स, महामार्गापासून 115 मीटर लांब दाखवून मंजूर केले. जागेवरील हकीगत अशी की, महामार्गापासून 115 मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम नाही. महामार्ग लगत 15 मीटरवर अवैध बांधकाम करून तेथे परमिट रूम लायसन्स चालविण्यात येत असून अवैध दारू विक्री होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निकषानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या लगत स्थित असलेले अनुज्ञप्ती मंजूर करताना किमान 75 मीटर अंतर सोडणे अनिवार्य आहे पण हॉटेल दीपक येथे अवैधरित्या परमिट रूम लायसन्स मंजूर करून चालविण्यात येत आहे. सदर हॉटेल हे नगररचना विभागाच्या मंजूर नकाशाच्या "ओपन स्पेस" जागेत असून अवैध रित्या बांधलेले आहे. सोबत मंजूर बांधकाम परवानगी नकाशाची प्रत नगर रचना अहमदनगर आणि दारूबंदी विभाग संयुक्त कारवाई करतील अशी अपेक्षा .

शेवगांव शहर आणि तालुक्यात सुद्धा अनेक परमिटरुम असेच नगर रचना नगरपरिषद आणि दारूबंदी विभाग यांचे नियम धाब्यावर बसून सुरु झाले आहेत मध्यन्तरी शेवगांव शहरातील गेवराई रोडवरील "हॉटेल सरगम" वर अशीच कारवाई करण्यात आली होती व शेवगांव पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या प्रकरणातील खरे आरोपी अजुन मोकाटच आहेत .शेवगांव चे कर्तव्यदक्ष पोलीस गंगाधर हि शक्तिमान असलेले आरोपी नक्कीच शोधुन काढतील* अशी शेवगावकरांना अपेक्षा.