*बार्शीतील नामवंत मूर्ती कलाकार श्री रमेश डोंगरे यांचा आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते सन्मान*
बि पि एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)
बार्शी. (ता.बार्शी). बार्शी येथील नामवंत मुर्ती व रंगरंगोटी
कलाकार श्री रमेश नानासाहेब डोंगरे यांचा बार्शीचे आमदार राजेंद्र
राऊत यांनी त्यांच्या कलेला वाव देऊन भगवंताची फोटो फ्रेम
देऊन सन्मान करण्यात आला. डोंगरे यांनी त्यांच्या कलेच्या
माध्यमातून भारतातील एकमेव असे भगवंत मंदिर असलेले बार्शी
येथील भगवंत मंदिरासमोरील
कारंजा मधील गरुड देवतेस अतिशय सुंदर व अप्रतिम रंगरंगोटीचे
काम डोंगरे यांनी केले त्यांची चौथी पिढी असलेले हे नामवंत कलाकार आहेत
बार्शी शहरातील काशिनाथ डोंगरे त्यांचे सुपुत्र नानासाहेब डोंगरे
आणि त्यांच्या कलेवर जोपासणारे रमेश डोंगरे आणि यापुढे
चौथ्या पिढीत पदार्पण करणारे केदार, धनराज, विराज.
डोंगरे यांनी
अनेक प्रकारची मूर्ती बनवली. नवरात्र उत्सव, गणेश उत्सव, श्री भगवंत उत्सव,
छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो वा इतर अशा विविध प्रकारच्या
उत्सवात त्यांनी मुर्त्या रंगरंगोटी करून बनविल्या.
त्यांनी श्री गणेश मूर्ती
क्षेत्रांमध्ये आपल्या पूर्वजांपासून चे चालत आलेले नाव अजरामर
ठेवले. त्याला खंड पडू दिला नाही. या २०२२ भगवंत महोत्सव
दिनाच्या माध्यमातून
रमेश डोंगरे यांना हा सन्मान गौरव देण्यात आला.