वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक कार्य करणा-या संस्था आणि व्यक्तींना ऑरेंज सिटी आयकॉन अवार्ड प्रदान | महिमा स्वयंसेवी संस्थेचा उपक्रम

वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक कार्य करणा-या संस्था आणि व्यक्तींना ऑरेंज सिटी आयकॉन अवार्ड प्रदान |  महिमा स्वयंसेवी संस्थेचा उपक्रम

वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक कार्य करणा-या संस्था आणि व्यक्तींना ऑरेंज सिटी आयकॉन अवार्ड प्रदान |

____________________________________________

 (महिमा स्वयंसेवी संस्थेचा उपक्रम)

_____________________________________________

नागपूर (दिनांक 21) जगाच्या पाठीवर अनेक विषयांवर विविध व्यक्ती, स्ंस्था सामाजिक भान जोपासून काम करतात आहे. अश्या संस्था, व्यक्तींची साधी दखल ही कुणाला घ्यावीशी वाटत नाही. अश्या या वर्तमान स्थीतीत व्यक्तींची, संस्थांची आणि त्यांच्या कार्याची समाजाने दखल घ्यावी या करिता पुढाकार घेवून संस्था आणि व्यक्तींकडून महिमा बहुउददेशिय सामाजिक संस्था - नागपूर च्या वतीने नामांकन मागविण्यात आलेले होते. या नामांकनामधुन वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक कार्य करणा-या संस्था आणि व्यक्तींची निवड करुन त्यांना ‘ऑरेज सिटी आयकॉन अवार्ड’ ने सन्मानित करण्यात आले.  

  बालहक्क, विद्यार्थी, महिला सक्षमिकरण ,पर्यावरण इत्यादी अनेक विषयांवर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने काम करणा-या महिमा बहुउददेशिय सामाजिक संस्था, नागपूर च्या वतीने दिनांक 15 ऑक्टुंबर रोजी धरमपेठ स्थित वनामती सभागृहात आयोजीत ऑरेज सिटी आयकॉन अवार्ड’ वितरण सोहळयात भारतातील ५० व्यक्ती व संस्थांचा समावेश होता. या वेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गो सेवा आयोग चे अध्यक्ष शेखर मुंदडा, प्रमुख अतिथी माजी राज्यमंत्री परिणय फुके , CWC मेंबर शिवशंकर शेलोकर , पाटणा येथील समाजसेविका नम्रता आनंद, समाजसेवक विजय लिमये , महिमा संस्थेच्या अध्यक्ष शीतल पाटील , आदिवासी निराधार महिला बहुउ्देशीय संस्थेच्या अध्यक्ष बबिता धुर्वे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सामाजिक भान जोपासून पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छता विषयावर कार्य करणारी संस्था कृषी महाविद्यालय आचळोली महाड, रायगड कॉलेज ऑफ फार्मसी, साई बाबा ग्राम विकास संस्था , सरस्वती नेर्सरी अँड फ़ार्म , राजेश वाघ यांची अपघातग्रस्ता साठी कार्य करणारी संस्था , ग्रुप ऑफ राइजिंग , देव कल्प टेकनॉलॉजी , ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट , आस्था संस्था आदिवासी निराधार महिला बहुउ्देशीय संस्था आणि वैविध्यपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती मनीष शर्मा - दिल्ली, नदीम अहमद - बिहार, समीर देसाई - पुणे , विजय कुमार सिंग - कानपुर , श्याम रावले - हिंगोली , मोनाली भोईटे - नागपूर , सुरेंद्र मेश्राम - नागपूर, राणी कळमकर - नागपूर, सुमित घोष - नागपूर, सुशीला बिडकर - अमरावती, शिवशंकर सेलोकर - नागपूर , राजवर्धन सिंग राजू - हरदोई , काब्या सिंग - कनौज , मुश्ताक पठाण - नागपूर , गजानन भटकर - नागपूर , मीनाक्षी धाडदे -नागपूर , प्रमोद कौरुती -नागपूर , मानसी कुकडे - नागपूर , समिधा इंगळे - नागपूर , ललिता गायकवाड - नागपूर, करुणा गागे - ठाणे, डॉ. मनीषा भातकुलकर - नागपूर , मेजर महेंद्र सोनावणे - पुणे, डॉ. अपर्णा खाडे - ठाणे यांचा यावेळी ऑरेंजसिटी आयकॉन अवार्ड 2023 देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे दिलखुलास निवेदन दिनेश मासोदकर आणि करुणा गगे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीते साठी संस्थेचे रेवती चालखोर , छब्बु थेवर ,महिमा पाटील , भूषण पवार , सिद्धेश हिरनवार, कार्तिक हिरनवार, आर्या वाघ हर्षित थेवर यांनी अथक परिश्रम घेतले.