इफकोच्या संचालक मंडळाची विशेष आमसभा दिल्ली येथे संपन्न

इफकोच्या संचालक मंडळाची विशेष आमसभा दिल्ली येथे संपन्न

इपकोच्या संचालक महामंडळाची

दिल्ली येथे विशेष आमसभा संपन्न .

जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर 

यशवंत पाटेकर

 श्री उदय कुमार अवस्थी यांच्यासोबत महाराष्ट्रातील संचालक मंडळ

बहुराज्य सहकारी समिती संशोधन अधिनियम 2023 नुसार दिनांक 3 व 4 ऑगस्ट 2023 पासून भारत सरकारने एक अधिसूचना लागू केली आहे. इफको ही बहुराज्य सहकारी संस्था असल्यामुळे अधिनियम 2023 या संस्थेलाही लागू होतात. या अधिनियमातील नियमांवर चर्चा व संशोधन करून बदल करणे अपेक्षित आहे. याशिवाय यामध्ये काही उपविधीही जोडल्या जाणार आहेत. यावर विचार विनिमय करण्यासाठी इफको च्या संचालक मंडळाची विशेष आमसभा 29 सप्टेंबर 2023 रोजी एन सी यु आय इ ऑडिटोरियम, नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झाली.

 या विशेष आमसभेसाठी जगदंबा महिला ग्राहक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. रूपाली बाळकृष्ण विघ्ने या उपस्थित होत्या.त्यांनी या आमसभेला उपस्थित राहून होणारे बदल व नवीन अधिनियम समजावून घेतले. या विशेष आमसभेसाठी भारतातील बहुसंख्य राज्यातील इफकोचे संचालक उपस्थित होते.