महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अहमदनगर कोट्यावधीचा निधी गायब मंजूर झालेल्या प्रकरणाचे पैसे गेले कुठे अर्जदाराचा संतप्त सवाल..
महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचा कोट्यावधीचा निधी गायब मंजूर झालेल्या प्रकरणाचे पैसे गेले कुठे अर्जदाराचा संतप्त सवाल
राज्यात अनुसुचित जाती प्रवर्गाच्या उन्नती साठी व व्यावसाया साठी अर्थीक मदत म्हणुण महाराष्ट्र शासनाने ह्या महामंडळाची स्थापना केली असली तरी ह्या विकास महामंडळा अनुसुचित जाती प्रवर्गाला फारसा उपयोग झालेला दिसुन येत नाही प्रकरणे दाखल केलेले अर्जदार ह्या का कार्यालयाच्या दारात हेलपाटे मारून थकतात परंतु सदरची प्रकरणे मंजुर होत नाहीत
सन २०२२ ते २४ सालात अहमदनगरच्या महात्मा फुले मागास वर्गीय विकास महामंडळच्या कार्यालयात जि प्रकरणे सादर करण्यात आली होती ति प्रकरणे मा जिल्हाधिकारी अहमदनगर कमेटीने मा जिल्हाधिकारी साहेबांनी मंजुर केली आहेत परंतु प्रकरण धारक लाभार्थ्याला त्याचा अद्याप लाभ मिळाला नसल्याने अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली असुन आमच्या मंजुर झालेल्या प्रकरणाचे पैसे गेले कोठे असा संतप्त सवाल अर्जदारांकडून होत आहे
ह्या अर्जदारांनी सदर कार्यालयात खेटा घातल्या तेथील अधिकारी कर्मचारी वर्ग उडवाउडवीची उत्तरे देऊन अर्जदारास परत पठवत असल्याचे दिसुन येत आहे शासन आपल्या दारी हि शासनाची संकल्पना असुन ह्या समजकल्याण विभागा साठी शासनाने जाहिरातीवर मोठा खर्च केलेला आहे तर अनुसुचित जाती साठी या विभागाकडून मोठ्या प्रमाणात विविध योजना राबविण्यात येत असल्याचा निव्वळ फार्स केला असुन सदर योजना केवळ कागदोपत्रीच दाखविण्यात आल्याचे सध्या तरी दिसुन येत आहे सदर कार्यालयातील आधिकारी वर्गाने ह्या चांगल्या संकल्पनेला मुठमाती देत शासनाच्या दारी हेलपाटे मारी हे धोरण अवलंबले ले दिसुन येत आहे तरी जिल्हाधीकारी साहेबांनी याकडे लक्ष घालुन प्रकरणे मंजुर झालेल्या लाभार्थ्याना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी अर्जदारांकडून होत आहे.