राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत पुणे येथिल देशि गायी संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प आरोग्याच्या दृष्टीने दिशादर्शक कुलगुरू डॉ पी जी पाटील.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा देशी गायी संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प आरोग्याच्या दृष्ठीने दिशादर्शक ठरेल असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी जी पाटील यांनी दि १८ सप्टेबर २०२४ रोजी राहुरी येथिल पत्रकारांनी
दिले भेटीत व्यक्त केले या वेळी डॉ पी जी पाटील म्हणाले की देशी गायी ह्या कोणत्याही वातावरणात टिकुन असतात त्या मुळे त्या आजाराला व रोगाला बळी पडत नाहीत त्या मुळे त्यांचे दुध शुद्ध असते ते मानवी अरोग्यास उपयुक्त ठरते त्याच बरोबर देशी गायीचे मलमुत्र देखील गुणकारी ।असल्याने त्याचाही उपयोग माणवी अरोग्यास उपयुक्त असुन आज या गोष्टींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकऱ्यांनी
दुग्धव्यावसाया बरोबर देशी गायी जरूर पाळाव्यात असे आवाहन डॉ पाटील यांनी केले या वेळी सदर प्रकल्पाची माहिती देताना या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ सोमनाथ माने व डॉ कणखरे यांनी सांगीतले कि सदर प्रकल्प हा स्वतंत्र पुर्व काळापासून चालू होता परंत सदर प्रकल्पाची दयनिय अवस्था झाली होती या प्रकल्पास कुलगुरू डॉ पी जी पाटील यांनी नव्याने संजिवणी देऊन अद्यावत केला आहे या देशी गायींच्या दुधाला व दुग्धजन्य पदार्थ तसेच मलमुत्राला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने चढ्या भावाने लोक खरेदी करत असुन भविष्यात सदर प्रकल्प भरभराटीला येईल सदर गायींच्या शेणापासुन पर्यावरण पुरक दिवे गणपती तसेच गो काष्ट निर्माण केले जात आहे
त्याच प्रमाणे पुणे कृषी महाविद्यालया अंतर्गत येणाऱ्या विविध विभागाला भेटी देण्यात आल्या या मध्ये गणेश खिंड येथील कृषी संशोधन केंद्राला महाराष्ट्र शासनाने जैववैविधता केंद्र म्हणून घोषीत केले आहे या केंद्रा मध्ये सुमारे २५० वर्षा पुर्विची पेशवे कालीन झाडांचे संगोपन व रक्षण करण्यात आले असुन जुनी झाडे जपून ठेवून नविन विविध फळबाग व फुलबागांचे सशोधन करत असल्याचे मत विभाग प्रमुख डॉ लाड यांनी व्यक्त केले
तसेच किटकशास्त्र विभाग प्रमुख व विद्यार्थ्या यांनी किटकांपासुन किडीचा प्रदुर्भाव रोखण्या साठी निर्माण केलेल्या विविध उत्पादना बाबत उपयुक्त माहिती दिली त्याच बरोबर आळंबी प्रकल्प ,हायटेक नर्सरी , जैविक खते प्रयोग शाळा येथे भेटी दिल्या असता ज्या त्या विभागाच्या विभाग प्रमुखांनी शेतकरी व विद्यार्थीच्या दृष्टीने संशोधना बाबत उपयुक्त माहिती दिली त्याच प्रमाणे मा कुलगुरू डॉ पी जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथे सुरू केलेल्या बेकरी व्यावसाया बाबत उपयुक्त माहिती देताना बेकरी प्रमुख सय्यद यांनी सांगीतले की राहुरी कृषी विद्यापीठाच्या बेकरी उत्पादनाला पुणे शहरात मोठी मागणी असल्याने लवकरच सर्व शहरात विक्री केंद्रे सुरू करणार आहोत
या प्रसंगी पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ महानंद माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले भेटी यशस्वी पार पाडण्यासाठी ड आजोतीकर व दत्तात्रय पाचारणे यांनी मोठे परिश्रम घेतले.