चाकण जवळ पुणे - नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

प्रतिनिधी-अचानक पडलेल्या पावसामुळे चाकण जवळील गवते वस्ती येथे पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, चाकण ला असणाऱ्या एम आय डी सी मुळे अनेक कामगार या रस्त्याने प्रवास करत असतात.परंतु अवकाळी पडलेल्या या पावसामुळे पुणे नाशिक महामार्ग तुडुंब पाण्याने भरला होता.त्यामुळे वाहतुकीला खूप मोठा अडथळा निर्माण होऊन प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.वाहतूक कोंडीमुळे लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.जवळपास पाच तासानंतर ही वाहतूक कोंडी सुरळीत झाली.