तीर्थक्षेत्र येलवाडी गावातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

तीर्थक्षेत्र येलवाडी गावातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

प्रतिनिधी - पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या येलवाडी गावात इतिहासात पहिल्यांदा च एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.सर्वानुमते गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक 2022 ही बिनविरोध करण्यात आली आहे.यामध्ये सविस्तर वृत्तांत असा की, गावात सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 33 उमेदवारांनी सदस्य पदासाठी तर 8 उमेदवारांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले होते.यामध्ये सरपंच पदासाठी एक तर सदस्य पदासाठी 11 उमेदवार अश्या प्रकारे निवडणूक घेण्यात येणार होती.परंतु गावातील सर्व वरिष्ठ लोक एकत्र येऊन बिनविरोध ची मीटिंग लावण्यात आली व यामध्ये सर्वानुमते एक सरपंच व 11 सदस्य यांची गावातील ग्रामदेवताच्या मंदिरात चिठया टाकून बिनविरोध निवड करण्यात आली.यामध्ये सरपंच पदी रंजित गाडे व सदस्य पदी विक्रम बोत्रे,मनीषा चौधरी,प्रशांत गाडे,प्रज्ञा बोत्रे,बंटी बोत्रे,बेबीताई पाटोळे,योगिता गाडे ,सुधीर गाडे, प्रदीप गायकवाड,उर्मिला गायकवाड,सुजाता गाडे यांची निवड करण्यात आली. या निवडणूकीमुळे होणारा सर्व खर्च वाचला असून त्या मध्ये गावातील धार्मिक व सार्वजनिक कामे केली जाणार असल्याचा निर्णय गावच्या वतीने घेण्यात आला आहे .गावामध्ये निवडणुकी मूळे होणारे सर्व मतभेद बाजूला ठेऊन हा निर्णयाला सर्वांनी मान्यता दिली .याबाबद्दल गावातील नागरिक तानाजी किसन गाडे यांच्याबरोबर चर्चा केली असता ,गावातील या निर्णयाचे त्यांनी मनापासून स्वागत केले आहे .तसेच भविष्यात होणाऱ्या सर्व सांस्कृतिक, धर्मिक व विकास कामामध्ये सर्व गावातील सर्व जण एकत्र येऊन काम करणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे.व येलवाडी गावचा आदर्श इतर गावांनी सुद्धा घ्यावा असेही ते म्हणाले.