लोणी येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न
लोणी येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न
प्रसाद घोगरे, प्रतिनिधी.. लोणी बु. येथे दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सुरभी मंगल कार्यालय, म्हसोबा मंदिर समोर आयोजित करण्यात आलेले विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती व मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन या उद्देशाने आयोजित या संमेलनाला परिसरातील हजारो हिंदू बांधव-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची प्रस्तावना आनंद आसावा यांनी केली. प्रमुख धर्माचार्य म्हणून पूज्य महंत ह.भ.प. अर्जुनजी महाराज तनपुरे यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख मातृशक्ती म्हणून मा. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते मा. श्री. योगेशजी कुमावत यांनी आपल्या प्रभावी भाषणातून हिंदू समाजाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित करत तरुण पिढीला संस्कृती जपत राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास नंदू शेठ राठी यांचीही उपस्थिती लाभली.
महंत अर्जुनजी महाराज तनपुरे यांनी आपल्या मनोगतात हिंदू धर्माची महान परंपरा, संस्कार व अध्यात्मिक मूल्ये जपण्याची आवश्यकता अधोरेखित केली. समाजात धर्माभिमान वाढवून एकजुटीने कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. मा. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा देत अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अशा संमेलनांमुळे समाजात एकात्मता निर्माण होऊन सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते, असे मत व्यक्त केले. भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गायत्री मस्के यांनी सुंदररीत्या केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिंदू महासंमेलन समिती, लोणी मंडळ पंचक्रोशी व सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व युवा नेते खासदार सुजय दादा विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शेवटी विजय माळवेसर यांनी आभार प्रदर्शन केले.
आयोजक, हिंदू महासंमेलन समिती, लोणी मंडळ पंचक्रोशी









