देवस्थान इनाम जमिनींच्या अधिग्रहणाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा विरोध; शासनाला पत्र*

देवस्थान इनाम जमिनींच्या अधिग्रहणाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा विरोध; शासनाला पत्र*

*देवस्थान इनाम जमिनींच्या अधिग्रहणाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा विरोध; शासनाला पत्र*

*मुंबई, दि. 5 मे 2026*: राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेल्या "महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, 2026" च्या मसुद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र विरोध दर्शवला आहे.

महासंघाच्या मते, हा मसुदा हिंदू देवस्थानांच्या धार्मिक आणि मालमत्ताविषयक अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. देवस्थानांना इनाम म्हणून दिलेल्या जमिनींमधून मिळणारे उत्पन्न हे देवस्थान चालवण्याचे मुख्य साधन आहे. नवीन कायद्यानुसार या जमिनी शासनाकडे हस्तांतरित झाल्यास देवस्थानांची मालकी संपुष्टात येईल, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

महासंघाने हा मसुदा तात्काळ मागे घेऊन देवस्थान इनाम जमिनींचे संरक्षण करावे अशी मागणी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांकडे केली आहे.