मुळा धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पत्रकार सचिन पवार यांचे उपोषण सुरु, धरणात बेकायदेशीररित्या मुरुम टाकून धरणास बाधा पोहचविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी .
अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी असणाऱ्यामुळा धरणा बाबत खळबळजनक प्रकार समोर येत आहे .या धरणावर घडलेल्या अनुचित प्रकारणाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार सचिन पवार यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून तसेच मुळा धरणावर उपोषण करून घडलेला प्रकार समोर आणला आहे .शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून 13 / 09/ 2021 पासून शासकीय दरबारी पाठपुरावा करूनही तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी केलेला अनागोंदी कारभार सर्वांच्या दृष्टीक्षेपात आणूनही आजपर्यंत यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने दि . 26 /01/2024 पासून मुळा धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे .
राहुरी कृषी विद्यापीठातील अभियंता पदावर काम करणाऱ्या मिलिंद ढोके यांनी विद्यापीठासाठी उपसा जलसिंचन योजनेचे काम केले आहे .सदरच्या कामासाठी घालून दिलेल्या अटी व शर्तीचा कोणताही वापर न करता हे काम केलेले आहे . या कामासाठी डोके यांनी 3500 ब्रास इतका मुरुम विद्यापीठ प्रक्षेत्रातूनच बेकायदेशीर उचलून तो मुरूम बेकायदेशीररित्याच मुळा धरणात टाकला आहे . पत्रकार सचिन पवार यांनी दि .13/09/2021 रोजी मा .जिल्हाधिकारी अहमदनगर ,जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता,कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग यांच्याकडे तक्रार केली.सदर तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य अभियंता जलसंपदा विभाग व अधीक्षक अभियंता जलसंपदा विभाग यांनी दखल घेऊन सदरचा बेकायदेशीर टाकलेला मुरूम काढून घेण्याबाबत वेळोवेळी प्रदीर्घ पत्र व्यवहार केले परंतु कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभागयांनी विद्यापीठ अभियंता यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता केवळ पत्र व्यवहार करून वरिष्ठांच्या आदेशास केराची टोपली दाखवून अभियंता ढोके यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे .
दि .15 ऑगस्ट 2023 रोजी मुळा धरणाच्या भिंतीच्या प्रवेशद्वारावर पत्रकार सचिन पवार यांनी उपोषण केले होते .उपोषणादरम्यानही मुरूम काढून घेण्याबाबत त्यांना आश्वासित करून उपोषण स्थगित करण्यास भाग पाडले होते मात्र अद्यापही नमूद अधिकाऱ्यांकडून कोणतेही कारवाई करण्यात आलेली नसल्याने हे उपोषण सुरू केल्याचे त्यांनी सांगितले आहे .
विद्यापीठ अभियंता ढोके हे विद्यापीठात सुरू असणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत अनेक वेळा चर्चेत आले आहे .त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही याचा अर्थशासकीय वरिष्ठ अधिकारी तसेच पुढारी यांचा त्यांना पाठिंबा असल्याची चर्चा पंचक्रोशीत होताना दिसत आहे .त्यातच मुळा धरणावर केलेल्या अनागोंदी कारभारावर ढोकेंवर व त्यांची पाठ राखण करणाऱ्या मुळा धरणाच्या कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .
राहुरी कृषी विद्यापीठ अभियंता यांचेवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सद्ध्या समोर आली असुन या बाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी कृषी विद्यापीठ प्रक्षेत्रातून जलसंपदा विभागाच्या मुळा उजव्या कालव्याच्या पोटचाऱ्या गेलेल्या असुन ह्या पोटचाऱ्याची सन २०१५ मध्ये तोडफोड करून मिलींद ढोके यांनी पाईप टाकुन रस्ता बनवला त्यामुळे पाटाच्या पोटचाऱ्यांची तोडफोड झाली तसचे ह्या नळ्या टाकताना मुळा पाटबंधारे विभागाची कोनतीही परवानगी राहुरी कृषी विद्यापीठ अभियंता ढोके यांनी घेतली नाही या बाबतची माहिती मुळा पाटबंधारे उपविभागाचे शाखा अभियंता प्रदिप नाईक यांना समजली असता श्री नाईक यांनी प्रत्यक्ष पहाणी करून विद्यापीठ अभियंता ढोके यांचेकडे चौकशी केली असता श्री ढोके यांनी शाखा अभियंता प्रदिप नाईक यांना अरेरावी केली म्हणुन मुळा पाटबंधारे विभागाचे तात्कालीन शाखा अभियंता श्री नाईक यांनी विद्यापीठ अभियंता मिलींद ढोके व त्यांचे सहकारी यांचे विरुद्ध भा.द. वि.कलम ३५३,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन राहुरी फौजदारी न्यायालयात SCC/3OOO14/ 2015 प्रमाणे खटला चालु असुन सदर खटल्याची पुढील सुनावणीची तारीख २२/ २/२०२४ राहुरी न्यायालयाने मुक्रर केली असुन या मध्ये पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अनेक वेळा विद्यापीठाच्या नावाला कलंक लावणाऱ्या व पदाचा गैरवापर करून शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या विद्यापीठ अभियंत्यावर व त्यांना पाठिशी घालणाऱ्या मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करून शासनाने भ्रष्ट अधिकाऱ्यांना चपराक द्यावी व आपली कार्यतत्परता सिद्ध करावी अशी चर्चा विद्यापीठ प्रक्षेत्रामध्ये व राहुरी तालुक्यामध्ये होताना दिसत आहे .विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके यांच्या भ्रष्टाचाराबाबत सर्वत्र चर्चा होत असताना त्यांच्याबरोबर कर्तव्यदक्ष कुलगुरू यांचेही नाव जोडले जात असल्याने कुलगुरूंनीही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चाही सर्वत्र होताना दिसत आहे .