*बार्शी येथे श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर सैतवाल जैन मंदिर; श्रींचा पालखी सोहळा हर्ष उल्हासात संपन्न*

*बार्शी येथे श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर सैतवाल जैन मंदिर; श्रींचा पालखी सोहळा हर्ष उल्हासात संपन्न*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

दि.12-09-2022 रोजी बार्शी येथे जैन समाजाच्या दशलक्षणीय पर्युषण पर्व सांगता समारोह पालखी सोहळा अतिशय हर्ष उल्हास मध्ये साजरा करण्यात आला.

या दशलक्षणीय पर्वामध्ये गुरु-मुनीच्या सानिध्यात राहून जैन मंदिर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक व पारंपरिक पद्धतीचे कार्यक्रम घेतले जातात. या पालखी सोहळ्यामध्ये ब्राह्मी महिला मंडळ, समता महिला मंडळ, एकता महिला मंडळ सर्व महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे कार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

तसेच, श्री दिगंबर 1008  जैन सैतवाल मंदिर चे विश्वस्त मंडळ तसेच सकल जैन समाज यांनी 31-08- पासून दक्षलक्षणीय पर्व सुरू होत असलेल्या कार्यक्रमा पासून ते पालखी सोहळ्या पर्यंत सर्वांनी तन-मन-धनाने कार्य केले. तसेच पालखीत सहभागी होऊन मिरवणूकीची शोभा वाढवली. श्रींची पालखी सकाळी 8:30 वाजता निघून ते रात्री 8:00 वाजता मंदिर येथे आली. या पालखी दरम्यान छत्रपती भवन येथे श्रींचे चढावे, बोली, अभिषेक व सर्वांचे सत्कार समारंभ करण्यात आले. पालखी निघत असताना वेगवेगळ्या पारंपारिक पद्धतीचे नाच, टिपऱ्या खेळण्यात आल्या. सर्व नवतरुण पिढीने या पालखी सोहळ्या दरम्यान अतिशय मनसोक्त आनंद घेतला.