वडगाव पाटोळे येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये पै अनिकेत तानाजी गाडे ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी
वडगाव पाटोळे गावात श्री भैरवनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतींना मोठ्या संख्येने बैलगाडा मालक, शेतकरी, बैलगाडा शौकीन, गाडा अनाउंसर, वाजंत्रीवाले, छोटे मोठे व्यावसायिक सहभागी झाले.या शर्यतीसाठी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर बक्षीस ही ठेवण्यात आले होते.एक दिवस पार पडलेल्या या शर्यतीमध्ये अनेक गाडामालक उपस्थित झाले. या मधे तीर्थक्षेत्र येलवाडी गावातील पै. अनिकेत तानाजी गाडे हे घाटाचा राजा व एक नंबर फायनल चे मानकरी ठरले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांना बक्षीसरुपी एक टू व्हीलर व भव्य ट्रॉफी देण्यात आली.महाराष्ट्राची अस्मिता व पारंपारिक वारसा असलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल वडगाव पाटोळे ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले .