बोगस बिनशेती भूखंडाची पन्नाशी शेवगाव तहसीलदारांचा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दोषींवर गुन्हे दाखल करा=:अरुण मुंडे
शेवगाव शहरात गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत तब्बल 55 गट नंबर मध्ये तहसीलदारांची बनावट सही व शिक्के वापरून बोगस अकृषीआदेश (एन .ए . ऑर्डर )निघाल्याचे निष्पन्न झाले आहे .यामुळे हे प्लॉट खरेदी करणाऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे .या सर्व प्रकरणाची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करावी . तसेच या जबाबदार असणारे महसूलचे अधिकारी कर्मचारी व दलाल यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केली आहे .
श्री .मुंडे यांनी शेवगाव .नगरपरिषदेच्या हद्दीततहसीलदार यांच्या बनावट सह्या व शिक्के वापरून अकृषिक आदेश तयार करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरू आहेत अशा बनावट आदेशाद्वारे भूखंडाची खरेदी विक्री व्यवहार करण्यात आलेले आहेत .यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे .या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्यास जबाबदार असणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शेवगाव तहसीलदारांना याबाबत चौकशी करून 15 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते .हा अहवाल तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असून त्यात तब्बल 55 गट नंबर मध्ये तहसीलदारांच्या बनावट सही शिक्के वापरून बोगस(एन .ए .ऑर्डर .) केल्याचे निष्पन्न झाले .ज्या गट नंबर मध्ये जे बोगस आदेश तयार झाले आहेत.त्यातील काही गट काही जे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य इतर प्रतिष्ठित नागरिक व खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या नावावर आहेत सदर बोगस आदेश हे सन 2018 ते 2021 या कालावधीतील असून त्या अगोदरही असे अनेक बोगस आदेश दिले असल्याचे संशय व्यक्त होत आहे.या तीन वर्षाच्या कालावधीत एकूण 70 आदेश पारित झाल्याचे तलाठी कार्यालयातील नोंदीवरून दिसून येते .मात्र यातील फक्त 15 आदेशाची नोंद तहसील कार्यालयाकडे उपलब्ध आहे .उर्वरित 55 आदेशाची कुठलीही नोंद तहसीलच्या दप्तरी नाही .त्यामुळे सदर गट नंबर मधील भूखंड प्लॉटघेणार .नागरिकांचे धाबे दणाणले आहेत अशा प्रकारची बोगस आदेश दाखवून भूखंड आक्रोश इक आहे .असे भासवायचे व अव्वाच्या सव्वा दराने त्याची विक्री करून नागरिकांना फसवणाऱ्या दलालांची टोळी शहरात कार्यरत असून यात भूखंड खरेदी विक्री करणाऱ्या काही व्यवसाय कांचा हि सहभाग आहे .
तहसीलकार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार बोगस असलेले गट नंबर पुढील प्रमाणे1)१३१७/८. २)७३०/२ . ३)१३०९/१/२. ४)१३१२/१ अ पै प्लॉट नंबर 15 व 16. 5) ७३०/२ पै प्लॉट 41 .54 .55 . 31 . 32 ६)१०९८/३ पै ७)७३१/१/३ पै ८)९६९/, पै ९)१३१६/१ ब . पै १०)११५७/२/२/ ब पै ११)२७४/४/१ पै १२)२२९/१ पै १३)१३१८/३/२ पै १४)१०९८/३ पै १५)७७१/१ १६)१३२३/१/ डॉ/२ १७)६९७/१पै १८)१३२३/१ ब १९)११७१पै २०)२४१पै २१)१०९८/३पै २२)२९२पै २३)७४६/७ २४)११५७/१पै/६ २५)२३९/४अ २६)१४१०/१/२/पै २७)७२४/१पै/प्लॉट -३० २८)४३३/१ २९)११३४/४पै ३०)११४८/२ ३१)११५०/२ ३२)७७१/१ ३३)३७१/१ ३४)११३४/१ ३५)३२३/१ ३६)११८५/५ ३७)४३३/१ ३८)६५१/१ ३९)१२०२/२ ४०)११७०/१पै.४१)६५१/२ ४२)३२३/१/४ या आदी गट नंबर चा सामावेश आहे. दरम्यान बोगस अकृषक आदेश करणारी टोळी तालुक्यात सक्रिय असून या मध्ये जे भरडले गेले आहेत याबद्दल त्यांना काही माहिती नाही. दोन दिवसापूर्वी तालुक्यात बोगस अपंग प्रमाणपत्र देण्याचे रॉकेट उघड झाले. त्यापुढे कोटीचा व्यवहार झालेले बोगस एन .ए. रॅकेट असून ते कोण करते हे सर्व शहराला माहित आहे याबाबतचे सर्व घोटाळे बाहेर काढून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा तीव्र स्वरुपचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी दिला आहे .