पाथर्डी तालुका सराफ सुवर्णकार व्यावसायिक संघटनेचा पारनेरचे आ. निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव अहमदनगर आणि दक्षिण भागातील अतिशय दयनीय अवस्थेत असलेले रस्त्याचे काम जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत पारनेरचे लोकप्रिय आमदार मा. निलेश लंके यांच्या आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे सुरुवात झाली. सर्व पाथर्डी तालुका सराफ सुवर्णकार संघटना त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज नगरला गेले होते आमदार निलेश लंके यांची नगर येथे उपोषण स्थळी भेट घेत रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात पाथर्डी तालुका सराफ सुवर्णकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता ता. सात डिसेंबर रोजी सायंकाळी पाठिंबा दर्शविला. यावेळी आमदार निलेश लंके. क्षितिज घुले. तालुका अध्यक्ष शिवशंकर राजाळे. बंडू पाटील बोरुडे. गहीनाथ शिरसाट. चांद मनियार.किसन आव्हाड. यांच्यासह आदींची भेट घेत चर्चा केली.
यावेळी सराफ संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जिरे साळ. राजेंद्र शेवाळे. मधुकर शहाणे. संजय दराडे. बाळासाहेब शहाणे. सुनील शहाणे. आदी सराफ व्यावसायिक उपस्थित होते श्री राजेंद्र शेवाळे. श्री बाळासाहेब जिरेसाळ. मधुकर मानूरकर. यांनी सक्रिय पाठिंबा केला.
गेल्या पाच-सहा वर्षापासून अतिशय खराब झालेले सर्वच राज्य महामार्ग शेवटच्या घटका मोजत आहेत पण विद्यमान खासदार आमदार आणि जिल्हा प्रशासनाला त्याचे काही सोयर सुतक नाही आता निकराचा लढा दिल्याशिवाय न्याय मिळणार नाही सार्वजनिक बांधकाम विभागातील गेंड्याच्या कातडीचे लोक आणखी किती जीव घेतल्यावर जागे होणार? हा एक प्रश्नच आहे.