नळाच्या पाण्यात कोंबडचे पिसे. पिवळे दूषित पाणी
शेवगाव तालुक्यातील आव्हाने खुर्द येथील सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाण्यात कोंबडीचे पिसे व पिवळे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी येत असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.
अधिक माहिती आशि की आव्हाने खुर्द येथील नागरिकांना पिण्याचे पाणी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे मिळते परंतु पाणी भरत असताना नळातून पिवळ्या रंगाचे पाणी येत असून त्या पाण्याचा दुर्गंध येतो पिसे ही पाण्यात येत आहेत हे पाणी पिण्यायोग्य नसून या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास हानी पोचू शकते.
याबाबत गावातील नागरिकांनी संबंधित अधिकारी यांना माहिती दिली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पाणी वरूनच खराब येते अशी कारणे दिली अशी माहिती गावातील किशोर सोंडे शशिकांत काकडे दिलीप भुसारी व ग्रामसेवक चंद्रकांत देशमुख यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.