कलंबर (बु).येथे हर्ष उल्हासात शिवजयंती उत्साहात साजरी.
बी. पी. एस. राष्ट्रीय लाईव्ह न्युज,
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे.
नांदेड- कलंबर(बु). रविवार दि.27-02-2022.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कलंबर(बु). येथे अतिशय हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.
गेली 2 वर्षांपासून कोरोना महामारी काळात शासनाचे पालन करून शिवजयंती अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आली.
मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाचे पालन करून 500 शिवभक्तांच्या आत ही जयंती साजरी करण्यात आली. कलंबर(बु) येथील शिवभक्तांच्या मनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.शिवजयंती अतिशय उत्साहात हिंदू-मुस्लिम सर्व धर्म एकत्र येऊन साजरी करण्यात आली.
यावेळी शिवप्रतिमेचे पूजन प्रवीण पाटील चिखलीकर, सभापती आनंद पाटील शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी सभापती शंकर पाटील ढगे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवजयंती कार्यक्रमाचे सर्वेसर्वा माजी जि.प.सदस्य बालाजी परदेशी, मंडळाचे अध्यक्ष श्रीधर गोरे, कैलास मेहर, धनंजय यादव आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक बळी पाटील भोकरे, अनिल पाटील, गणेश पाटील, शिव सहकारी सोसायटीचे चेअरमन सुनीलआप्पा मुकनवार, संजय शिरा, भैयालाल मंडले, उमाकांत पाटील, शंकर भुतेवाड, सवराते, शिवाजी तेलंग आदी शिवभक्ता सह शिवजयंती शांततेत पार पडली.