भगवंत नगरी बार्शीत डॉ.कुंताताई नारायण जगदाळे "जीवन गौरव" पुरस्कार सोहळा संपन्न.
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर.
जिल्हा प्रतिनिधी सम्मेद तरटे.
बार्शी- (ता.बार्शी). दि.06-03-2022 रोजी डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्था बार्शी आयोजित- डॉ. कुंताताई नारायण जगदाळे "जीवन गौरव" 2020-21 पुरस्कार सोहळा अति उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री जयकुमार शितोळे हे होते. प्राचार्य श्री महेंद्र कदम यांनी संबोधित केले की, आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री वर्ग पुढे आहे. आज वैद्यकीय क्षेत्राचा तसेच शेतीचा शोध, तांदळाचा शोध अशा विविध प्रकारचा शोध स्त्रीने लावलेला आहे. अशा प्रत्येक क्षेत्रात स्त्री अग्रेसर असते आणि त्याच स्त्रीला आजच्या काळात वंचित मानले जात आहे.
रस्त्यावरील भिकारी लोक आत्महत्या करीत नाहीत पण समाजातील सुशिक्षित लोक आत्महत्या करत आहेत ही एक निंदनिय बाब आहे.
आज आपल्या भारतात काही लोक संविधानाचा सुद्धा विरोध करताना दिसत आहेत अशी एक विकृत जात सुद्धा जन्माला आलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे खराब प्रवृत्तीचे बुद्धीचे लोक या देशात आहेत. कुठेतरी याला आळा बसला पाहिजे असे कदम सर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती स्थानी माजी नगराध्यक्ष- श्री विश्वास बारबोले, माजी नगराध्यक्ष- रमेश (आण्णा) पाटील, प्राचार्य डॉ. सौ भारती रेवडकर, युवा उद्योजक (बंडूभाई शहा ज्वेलर्स)- श्री मनीषभाई शहा, उपशिक्षणाधिकारी उस्मानाबाद- श्री रावसाहेब मनगिरे, बार्शी नगरसेविका- सौ पुष्पा वाघमारे यांनी आपले स्थान भूषविले.
डॉ. कुंताताई नारायण जगदाळे "जीवन गौरव" पुरस्काराचे तथा उल्लेखनीय काम करणारे मानकरी- प्रा श्री तानाजी ठोंबरे (सामाजिक क्षेत्र), श्री राजेंद्र देशमुख (कृषी क्षेत्र), श्री रामचंद्र इकारे (साहित्य क्षेत्र), श्री सतीश अंधारे (बांधकाम उद्योजक), डॉ. सौ. शीतल बोपलकर (वैद्यकीय क्षेत्र), श्री गणेश गोडसे (पत्रकारिता क्षेत्र), प्रा.सौ माधुरी शिंदे (शैक्षणिक क्षेत्र), श्री विनोद कांबळे (कलाक्षेत्र), श्री अरविंद कोळी (क्रीडाक्षेत्र) यांना जीवन "गौरव पुरस्कार" देण्यात आला.
या ठिकाणी संचालक कार्यकारी मंडळ व प्रतिष्ठित नागरिक तथा उद्योग मंडळींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.