*बार्शी मध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन*

*बार्शी मध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन*

बी पी एस लाईव्ह न्यूज सोलापूर

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

बार्शी.- शिवरात्र महोत्सव बार्शी- बार्शी शहर येथील नागरिकांना ज्योतिर्लिंगाचे दर्शन बार्शीतच.

पूर्ण महाराष्ट्रात बार्शी असे एकमेव शहर आहे तिथे येथील भक्तांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यास मिळते. अतिशय प्राचीन असे बारा ज्योतिर्लिंग मंदिर खालील प्रमाणे-

1) श्री बळेश्वर मंदिर

2) श्री भोगेश्वर मंदिर

3) श्री पाताळेश्वर मंदिर

4) श्री रामेश्वर मंदिर श्री 

5) श्री मल्लिकार्जुन मंदिर

6) श्री भीमाशंकर मंदिर

7) श्री शंकेश्वर मंदिर

8) श्री पंचमुखी परमेश्वर मंदिर

9) श्री नगरेश्वर मंदिर

10) श्री बुद्धेश्वर मंदिर

11) श्री उत्ततरेश्वर मंदीर

12) श्री गणेश्वर मंदिर

असे हे बार्शीतील बारा ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहेत.

आज शिवरात्र निमित्त सर्व ज्योतिर्लिंग मंदिरात भरपूर प्रमाणात पूजा-अर्चना करण्यात आली. गेली दोन वर्षांपासून मंदिरे बंद होती पण कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याने सर्व मंदिरे उघडण्यास आली असल्याकारणामुळे बार्शीतील भक्तमय जनता दर्शनासाठी उत्सुक झालेली होती.

बार्शी येथे एक विशिष्ट असे अलौकिक भगवंत मंदिर आहे. हे केवळ भारतामध्ये एकमेव असे भगवंत मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणून ह्या गावाला भगवंत बार्शी असे नाव आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा अजून असल्यामुळे बार्शीतील भरपूर प्रमाणात जनतेने मास्क घालून ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले.