"चवदार तळे सत्याग्रह" या दिनानिमित्त नर्सी या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

"चवदार तळे सत्याग्रह" या दिनानिमित्त नर्सी या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

बी पी एस राष्ट्रीय न्युज

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

नायगाव- नरसी-         पाणी हे निसर्गाने दिलेली देण, निर्मित असूनही पाणी घेऊन दिल्या जात नव्हते. या कारणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड ह्या ठिकाण चे चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून सत्याग्रह केला.

म्हणून या दिनाचे महत्त्व,औचित्य साधून 20 मार्च रोजी नरसी येथील शासकीय विश्रामगृहात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फुले, शाहू, आंबेडकर क्रांतीमंच च्या वतीने अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "शिक्षित व्हा - अशिक्षित राहू नका" हा संदेश दिला.

यावेळी फुले, शाहू, आंबेडकर क्रांती मंचचे प्रमुख- श्री भास्कर भेदेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री इंद्रजीत डुमणे, तलाठी- श्री विजय जाधव, भिमशाहीर- श्री गौतम भालेराव, श्री किरण इंगळे, मा. खाजाभाई शेख, श्री धम्मानंद भद्रे, श्री मिलिंद बच्छाव, श्री प्रकाश होनसांगडे, श्री सूर्यकांत भेदे, श्री शिवाजी इबितवार, श्री कुंटूरकर यांच्या सह फुले, शाहू, आंबेडकर क्रांती मंचचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.