*कासारवाडी गावात भजनी मंडळांच्या भक्तीत श्री राम जन्म महोत्सव उत्साहात साजरा*
बिपिएस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी सम्मेद तरटे
बार्शी.(ता. बार्शी) कासारवाडी- दि.10-04-2022 रोजी कासारवाडी या ठिकाणी भजनी मंडळाच्या ठेक्यात श्रीराम जन्म मोठ्या उत्साहात साजरा झाला.श्री राम प्रभू हे एक वचणी-एक, वाणी-एक, पत्नी होते. त्यांनी आपल्या साम्राज्यातील नागरिकांना कधीच दुःख दिले नाही, दुखी होऊ दिले नाही स्वतः दुःख वाटून घेऊन दुसऱ्यांना सुख देऊन राम राज्य चालवलं असे आपल्या हिंदू धर्माचे प्रतीक मानले जाणारे श्री रामचंद्र प्रभू यांचा जन्म दुपारी 12:00 वाजता कासारवाडी या गावात संपन्न झाला.
यामध्ये गावातील सर्व भजनी मंडळांनी, गावकरी मंडळांनी घेऊन या जन्म महोत्सवाचा आनंद घेतला. जन्मोत्सव झाल्यानंतर लगेचच प्रसाद म्हणून भोजनाची व्यवस्था केली होती.
तसेच "हनुमान जयंती" निमित्त "अखंड हरिनाम सप्ताह" व श्री "ज्ञानेश्वरी पारायण सोहळा" या कासारवाडी गावात सुरू झालेला आहे. या श्रीराम जन्म महोत्सवाच्या कार्यक्रमावेळी-
कीर्तनकार- ह.भ.प. संजय करपे महाराज' गायनकार- गुणवंत मंडलिक, बालाजी पालकर, मोहन गुंड, पेटी मास्तर- भगवान सरवदे, नियोजनकार- सूर्यभान मंडलिक, मारुती गायकवाड, जितेंद्र गायकवाड, नितीन मंडलिक, बाळू मंडलिक, सूर्यकांत मंडलिक, शिवाजी पाटील, नानासाहेब पाटील, कार्यवाहक- दत्ता रणपिसे, बाबासाहेब चौधरी, सोमा मंडलिक, समाधान गुंड, भाऊ जाधव, हनुमंत शिंदे, प्रवीण शिंदे, कुलदीप मोरे, प्रसाद मस्के, शिवाजी केंदळे, अभिजीत मंडलिक, कृष्णा साळुंखे, खंडू गुंड तसेच गावातील सर्व ग्रामस्थ मंडळींनी उपस्थित राहून या महोत्सवाची शोभा वाढवली.