बार्शीत जाच प्रकरणी पत्नीचा नांदेड (वजिराबाद) मधील पती विरुद्ध गुन्हा दाखल.

बार्शीत जाच प्रकरणी पत्नीचा नांदेड (वजिराबाद) मधील पती विरुद्ध गुन्हा दाखल.

बि पि एस राष्ट्रीय न्यूज.

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

बार्शी-     पत्नीवर संशय घेऊन तिच्यावर नजर ठेवून घरांमध्ये मिनी कॅमेरे बसवून जाचहाट करून छळ केल्याचा प्रकार वजीराबाद ता.जि.नांदेड येथे घडला.

शिल्पा निखील शर्मा (वय 33). राहणार स्टेशन रोड, बार्शी या विवाहितेच्या फिर्यादीवरून पती निखिल शर्मा, दीर निहाल शर्मा, जाऊ नीलम शर्मा व ननंदवा प्रकाश खंडेलवाल (रा.मातृछाया बिल्डींग, मारवाड गल्ली वजीराबाद) यांच्यावर बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती निखिल शर्मा हे दारू पिऊन धिंगाणा घालून मारहाण करत असतात व संशयित पाळत नजर ठेवण्याच्या उद्देशाने घरात सी. सी. टीव्ही कॅमेरे लावून शारीरिक व मानसिक छळ केला. दीर निहाल शर्मा व जाऊ नीलम शर्मा व ननंदवा प्रकाश खंडेलवाल यांनी 9 मार्च ला वडील शिवराज खंडेलवाल व भाऊ श्रीकांत खंडेलवाल यांना मारहाण व दमदाटी करून शिवीगाळ केली आहे. असा बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.