जून मध्ये येऊ शकते कोरोना ची चौथी नवी लाट/ कानपूर अहवाल
*चीनमध्ये कडक लोकडाऊन* तर "इस्राईलमध्ये मध्ये नवीन व्हेरियन्ट मुळे चिंता वाढली."
बी पी एस न्यूज सोलापुर.
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
जयपुर- पहिल्या दोन लाटे पेक्षा तिसरी कोरोनाची लाट ही कमी प्राणघातक होती, परंतु अद्यापही कोरोना संपलेला नाही. चीनमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त वाढलेला दिसत आहे.
चीनच्या मतानुसार मोठ्या प्रमाणात कोरोनाचा विस्तार होत आहे. आणि इस्रायल मध्ये नवीन कोरोना चा प्रकार आलेला असल्यामुळे सरकारची अजून चिंता वाढलेली दिसत आहे. त्याचवेळी आय आय टी कानपूरच्या संशोधकांनी भारतामध्ये चौथी लाट येईल असा इशारा दिला आहे. आय आय टी कानपूर च्या मेडराइव्ह मासिकात नुकत्याच झालेल्या प्रकाशित अहवालात भारतामध्ये चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. ही लाट कमीत कमी तीन ते चार महिने राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. आणि ही लाट किती प्राणघातक होईल याचा अंदाज लागलेला नाही.
चीनमध्ये कोरोना संख्या झपाट्याने वाढत आसल्याकारणाने तिथे त्याचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चीनमधील शांघाय, होंगकोंग, जीलीन, फुजीयान या सारख्या 11 प्रमुख शहरांमध्ये कडक लोकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. चीन मध्ये "शुन्य कोविड पॉलिसी" अवलंबून ही इ -2 ,अँट सब -व्हेरीअँट हे प्रकार वाढण्याचे कारण आहे. राजस्थान राज्य कोविड व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि एस एम एस हॉस्पिटल चे माजी वरिष्ठ डॉक्टर वीरेन्द्र सिंह यांच्या मते जर कोरोना ची लाट राजस्थानमध्ये आली तर याचा लहान मुलांवर जास्त परिणाम होईल व घातक ठरेल. आपण काटेकोरपणे करोणा चे पालन केलेच पाहिजे असे मत मांडण्यात आले.
जरी आपल्या शरीरात लसीकरणाद्वारे अँटीबॉडीज तयार झालेल्या असल्या तरी अद्यापही कोरणा विषाणू पूर्णपणे नष्ट झालेला नाही. सरकार पंधरा वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त मुलांचे लसीकरण करत आहे. आणि अलीकडेच 12 ते 14 वयोगटातील मुलांना लसीकरण देण्याचे काम सुरू करण्यात आलेली आहे. परंतु अजूनही या मुलांना धोका कायम असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या राजस्थानमध्ये करोना कमी प्रमाणात दिसत असल्यामुळे मार्चच्या 17 दिवसात पूर्ण राज्यात 2707 रुग्ण आढळले आहेत तर 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. जयपुर जिल्ह्यात सर्वात जास्त 1099 रुग्ण आढळून आलेले आहेत तर 3 जणांचा मृत्यू झालेला आहे असे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे या चौथ्या लाटेच्या भीती कारणामुळे भारतामध्ये सर्व राज्यातल्या नागरिकांनी मास्क कंपल्सरी वापरावे व कोरोनाचे काटेकोरपणे पालन करावे तरच आपण ह्या चौथी लाटेवर मात करू शकतो.