*बार्शी तालुक्यातील पांगरी गावचा सुपुत्र सुदर्शन गोडसे हा MPSC परीक्षेत राज्यात 21वा*

*बार्शी तालुक्यातील पांगरी गावचा सुपुत्र सुदर्शन गोडसे हा MPSC परीक्षेत राज्यात 21वा*

बिपिएस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज सोलापूर

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

पांगरी.(ता.बार्शी)      पांगरी तालुका बार्शी येथील सुदर्शन दत्तात्रेय गोडसे याने 2020 मध्ये एमपीएससी परीक्षेच्या आयोगाकडून घेण्यात आलेल्या इंजीनियरिंग स्पर्धा परीक्षेत राज्यात 21 वा येऊन उल्लेखनीय यश संपादित केले.

सुदर्शन हा चौथीमध्ये स्कॉलरशिप परीक्षेत पहिला आला होता. त्याने एनडीए परीक्षा उत्तीर्ण केली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्यातून सिविल इंजीनियरिंगची डिग्री प्राप्त केली आहे. त्याची आर्मी मध्ये लेफ्टनंटपदाच्या इंटरव्यू करिता पण निवड झाली होती.तो यूपीएससी, आयएएस परीक्षा पण उत्तीर्ण झाला होता.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडा मध्ये सहाय्यक अभियंता पदी निवड झाली आहे.