*बार्शी बस डेपोतील एसटीच्या दुर्दशे मुळे बार्शी तालुक्यातील प्रवाशांचे बेहाल*

*बार्शी  बस  डेपोतील  एसटीच्या   दुर्दशे  मुळे  बार्शी  तालुक्यातील  प्रवाशांचे  बेहाल*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज  

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)

बार्शी (ता.बार्शी)           बार्शीतील बस डेपो मधील एसटीचे बेहाल, एसटी बस ची दुर्दशा वरचेवर खराब होत असल्याचे दिसून येते असे बार्शी तालुक्यातील प्रवाशांचे म्हणणे आहे. कित्येक बसला काचा नाहीत, रात्रीसाठी एसटीमध्ये लाईट नाही, गाडी रात्री अप रात्री मध्येच बंद पडते, त्यातून कर्मचाऱ्यांना फोन करून विचारल्यास उलट उत्तर येतात, गाडीची स्वच्छता नाही अशा प्रकारच्या तक्रारी बार्शी तालुक्यातील प्रवासांच्या बार्शीतील आगारप्रमुख मिसाळ मॅडम त्यांच्याकडे देण्यात आल्या आहेत.

पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी च्या वतीने तक्रारी निवेदन प्रवाशाकडून देण्यात आले आहे. आगार प्रमुख यांनी तात्काळ या तक्रारी निवेदनाचा विचार करून त्याचे योग्य ते पाऊल उचलावे अशी मागणी पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी कडून केली जात आहे. हे तक्रारी निवेदन बस डेपो मधील नितीन गावडे यांना देण्यात आले.

तसेच त्यांच्यासोबत बार्शी बस डेपो येथील जयसिंग परदेशी हे होते. त्यांना बार्शी तालुक्यातील प्रवाशांचे कशाप्रकारे हाल होत आहेत हे प्रवाशासहित सांगण्यात आले. त्याचप्रमाणे बार्शी- चारे- वालवड या एसटीची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. एका बस मध्ये 75 ते 80 प्रवासी कोंबले जातात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. तसेच गाडीची वेळ बरोबर नसल्याने विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान व परीक्षेत नुकसान होत आहे. त्याचबरोबर महिलांचे, वृद्धांचे व शाळेतील विद्यार्थी -विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. हे निवेदन देताना बुजुर्ग प्रवासी, विद्यार्थी -विद्यार्थिनी तसेच पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका विभाग प्रमुख- उमेश आनेराव, तालुका संपर्कप्रमुख- सम्मेद तरटे, महिला तालुका अध्यक्ष- सुप्रिया काशीद, तालुका उप-संपर्कप्रमुख- अमृता आनेराव, तालुका कार्याध्यक्ष- संतोष दराडे, शहराध्यक्ष- अभिजीत माळी, कार्याध्यक्ष- रमेश डोंगरे, संतोष घोंगाने, सागर काशीद, अभिषेक लाला, अमर खराडे, निशिकांत सुतार, भाऊ सरवदे, महिला शहर अध्यक्ष- मीनाक्षी साळुंखे, उपाध्यक्ष- कौशल्य राऊत, संघटक शिवलिंग बुके, शारदा मोहिते, सारिका आनेराव, राधा घोंगाने, भाग्यश्री बोंडवे व बार्शी तालुक्यातील प्रवासी शालेय विद्यार्थी उपस्थित होते.