*बार्शी तालुका स. पो. नि. श्री शिवाजीराव जायपत्रे यांच्या संयोजनांने 241 जणांचे भव्य रक्तदान शिबीर संपन्न.*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
(बार्शी)
बार्शी.(ता. बार्शी). दि.30-06-2022 रोजी बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे सहा.पोलीस निरीक्षक श्री शिवाजीराव जायपत्रे यांच्या संयोजनाने भव्य अति भव्य 241 जणांचे रक्तदान शिबिर पार पडले.
श्री जायपत्रे साहेब यांनी महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्या कारणाने त्यांच्या मनात विचार आला आणि त्यांनी त्यांचे विचार लगेचच अमलात आणून बार्शीतील जनतेला आव्हान केले. तेव्हा त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत पोलीस जाणीव सेवा संघ बार्शीच्या पदाधिकारी व सदस्य जवळ जवळ 20 ते 25 जणांनी रक्तदान करून सहकार्य केले.
तसेच बार्शीतील नागरिकांनी व आसपासच्या गावातल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून सहकार्य केले. यावेळी रक्तदान करताना श्री जायपत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस- आप्पासाहेब लोहार, महेश डोंगरे, कांतीलाल लाड, हर्षवर्धन वाघमोडे यांचे सहकार्य लाभले.
तसेच बार्शी तालुका विभागप्रमुख- श्री उमेश आणेराव, उपविभागप्रमुख- समाधान विधाते, तालुका संपर्क प्रमुख- सम्मेद तरटे, बळेवाडी उपाध्यक्ष- धीरज सोनवणे, संतोष घोंगाने, सागर काशीद, अमोल बुके, तालुका महिला अध्यक्ष- सुप्रियाताई काशीद, सदस्य- सारिकाताई आणेराव, राधाताई घोंगाने आदी उपस्थित होते.