*पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र बार्शी टीम व महिला रणरागिनी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने बार्शी येथील स्मशानभूमीचे स्वच्छता अभियान*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)
दि.26-06-2022 रोजी पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी टीम व महिला रणरागिनी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने बार्शी येथील प्रसन्नदाता ट्रस्ट संचलित वैकुंठभूमी (मंगळवार पेठ) या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यामध्ये पोलिस जाणीव सेवा संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य महिला सदस्य यांनी एक आपली सामाजिक बांधिलकी जपून माणुसकीची जाण ठेवून ही स्मशानभूमी स्वच्छता मोहीम हाती घेतली. एवढेच नाही तर प्रत्येक महिन्यातील एक दिवस हा स्मशानभूमीसाठी आम्ही देणार असे आश्वासन या बार्शीतील पोलीस जाणीव सेवा संघाच्या पदाधिकारी यांनी दिले.
ही संघटना बार्शी मध्ये चार ते पाच वर्षापासून कार्यरत आहे या संघटनेने कोविड महामारी काळात पोलीस बांधवांना व नागरिकांना सहकार्य केले ज्यावेळेस पूर्णतः हॉटेल इ. दुकाने बंद होते त्यावेळेस या संघटनेने पूर्ण बार्शी तालुक्यात सर्व चेक पोस्टवर तसेच वैद्यकीय स्टाफ नगरपालिका स्टाफ यांना या पोलीस जाणीव संघ संघटने च्या वतीने सहकार्य केले तसेच पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जयंती बंदोबस्तामध्ये सुद्धा ही संघटना कार्य करत असते. ही संघटना पूर्णतः पोलीस बांधवांसाठी व नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असते.
तसे पाहिले तर ही बार्शीतील स्मशानभूमी स्वच्छतेबाबत महाराष्ट्रात दुसर्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी पूर्णतः बगीचा आहे. या ठिकाणी देवी देवतांचे मंदिरे, फळबागा, अशा विविध प्रकारचे झाडे या ठिकाणी लावलेले आहेत. वेगवेगळ्या चित्रकलेतून चांगले व वाईट बाबत चे दृश्य यााठिकाणी लावलेले आहेत. या प्रसन्नदाता ट्रस्टचे अध्यक्ष- श्री कमलेशभाई मेहता व त्यांची पूर्ण टीम- बसवेश्वर गाढवे, बंडू माने, तानाजी आरगडे, धनंजय गायकवाड, अशोक फल्ले, केदरनाथ बेताळे, जयेश गुप्ता, प्रशांत गायकवाड, अशोक गुडे, बापू झाल्टे, प्रकाश गायकवाड, महेश येमलवार, हेमंत गाढवे, तम्मा विभुते, ललित वस्ताद, सिद्धार्थ कानडे, धीरज टोणपे, अजित शेळगावकर, दीपेश येमलवार हे सर्व अतिशय तन-मन-धनाने या वैकुंठ भूमी कडे लक्ष देऊन सेवा करत असतात. अशीच सेवा या पोलीस जाणीव सेवा संघाकडून घडावी असे मत संघाच्या टीमकडून मांडण्यात आले.
श्री प्रसन्नदाता ट्रस्ट संचलित स्मशानभूमी यांच्या वतीने पोलीस जाणीव सेवासंघ महाराष्ट्र राज्य बार्शी टीमचा भगवंताची फोटोफ्रेम देऊन आदर् सहित सत्कार करण्यात आला तसेच संघाचे कौतुक पण केले. या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी तालुका विभाग प्रमुख- श्री उमेश आनेराव, उपविभाग प्रमुख- समाधान विधाते, बार्शी तालुका संपर्कप्रमुख- सम्मेद तरटे, शहराध्यक्ष- अभिजीत माळी, मार्गदर्शक- भगवान लोकरे सर, तालुका कार्याध्यक्ष- संतोष दराडे, शहर कार्याध्यक्ष- रमेश डोंगरे, बळेवाडी उपाध्यक्ष- धिरज सोनवणे प्रमुख सदस्य- विजय माळी, दत्ता माने, उमेश पंडित, रमेश कानडे, सागर काशीद, गणेश सातारकर,
महिला बार्शी तालुका अध्यक्ष- सुप्रियाताई काशीद तालुका संपर्कप्रमुख- रूपालीताई विधाते, उप संपर्कप्रमुख- अमृताताई आणेराव, शहराध्यक्ष- मनिषाताई साळुंखे संपर्कप्रमुख मनिषताई लोकरे कार्याध्यक्ष मीनाक्षीताई कानडे संघटक- पूजाताई सातारकर, राधाताई घोगाने, बळेवाडी महिला अध्यक्षा- वर्षाताई तरटे, सदस्य नीताताई काजळे, सारिकाताई आनेराव या सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने कार्य करून एक सामाजिक कार्याचा वाटा उचलला.