*जैन धर्मातील सर्वात मोठा सण-उत्सव*

*जैन  धर्मातील  सर्वात  मोठा  सण-उत्सव*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)

जैन धर्मातील सर्वात मोठा उत्सव मानला जाणारा सण पर्युषण पर्व हा आहे. हा उत्सव जैन धर्मातील सर्व श्वेतांबर पंथ व दिगंबर पंथ अतिशय हर्ष उत्साहाने साजरा करतात. हा सण भाद्रपद महिन्यामध्ये सुरू होतो. श्वेतांबर पंथाचा पर्युषण पूर्व संपल्यानंतर हाच सण दिगंबर पंथाचा दहा दिवसीय उत्सव म्हणजेच "दशलक्षणीय" पर्व हा सुरू होतो. हा सण सुरू होण्यापूर्वी सर्व मंदिराची साफसफाई स्वच्छता केली जाते.

या पर्युषण पर्व मध्ये जैन धर्मांच्या पाच सिद्धांताचे पालन केलं जाते तेे पाच सिद्धांत म्हणजे म्हणजे सत्य, अहिंसा, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचार्य व अपरिग्रह (गरजेपेक्षा अधिक धन न जमा करणे) हे होय.

हा सण साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आत्म्याची शुद्धी करून योग्य उपक्रमावर लक्ष केंद्रित करणे. पर्यावरणाप्रती आत्मा तटस्थ केल्याशिवाय शुद्धी होत नाही यासाठी "कल्पसूत्र" या तत्त्वार्थ सूत्राचे वाचन आणि विवेचन यामध्ये केले जाते. संत-मुनि यांच्या सानिध्यात हा सण साजरा केला जातो. पूजा-अर्चना, आरती, त्याग, तपस्या आणि उपवास करून जास्तीत जास्त वेळ हा संतांच्या सानिध्यात व मंदिरात घालवला जातो. शिवाय आपल्या दैनंदिन कामापासून दूर राहण्याचा प्रयत्न पण केला जातो. हजारो लोक निरंकार उपास करतात तसेच निरंकार तपस्या सुद्धा करतात तर काही लोक दहा दिवस फक्त दोन वेळेच्या पाण्यावर उपास करतात. हा सण भारताशिवाय अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जर्मनी, जपान या ठिकाणी सुद्धा केला जातो.