रिधोरा येथे पशुचिकीत्सा शिबीर सपन्न

1.

काटोल:- पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती काटोल द्वारा महादूत अंतर्गत  गोचीड निर्मूलन शिबिराचे आयोजन रिधोरा येथील पुशुवैद्यकीय दवाखान्यात संपन्न झाले .या कार्यक्रमाला  90 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले पशुधन दवाखान्यात आणून या शिबिराचा लाभ घेतला .काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांच्या हस्ते गायीची पुजाकरुन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या शिबिरामध्ये गोचीड निर्मूलन, वंधत्व तपासणी ,गाईची गर्भधारणा तपासणी तथा निशुल्क औषधोपचार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांच्या समवेत  सरपंच श्रीमती नलिनी राऊत, सामाजिक कार्यकर्ते टुलेश्वर जवंजाळ ,डॉ. खंडारे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, डाँ. शेंडे पशुधन विकास अधिकारी, पर्यवेक्षक डाँ.रायपुरे डॉ. कोसरकर, डॉ. चौरे ,डाँ.पाटील डाँ.नागपुरे ,डाँ.ब्राह्मणे आदींची तथा शेतकरी वर्गांची फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.