वीरा फाउंडेशन चा ३रा वर्धापन दिवस थाटात संपन्न
1.
वीरा विदर्भ गौरव रत्न पुरस्काराचे वितरण
काटोल:- वीरा फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे तिसरा वर्धापन दिवस नुकताच स्थानिक चरडे सभागृहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमा वेळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वीरा विदर्भ गौरव रत्न पुरस्कार चे वितरण करण्यात आले.
या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचे अध्यक्ष वीरा फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीलदादा वडस्कर तर प्रमुख अतिथी म्हणून जगजीत सिंग, डॉ. देवेंद्र वानखेडे, वीरा फाउंडेशनचे संचालक सुयोग निलदावार, जिल्हा परिषद चे सदस्य समीर उमप, पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे, जिल्हा परिषद माजी सदस्य देविदास कठाणे, राजेश काकडे, प्रशांत मानकर, पंचायत समितीची माजी सभापती धम्मपाल खोब्रागडे, पंचायत समिती सदस्य निशिकांत नागमोते, विठ्ठलराव काकडे, व वीरा फाउंडेशनचे सचिव वृषभ वानखेडे इत्यादी गणमान्य उपस्थित होते.
याप्रसंगी वीरा फाउंडेशन च्या वतीने वीरा विदर्भ गौरव रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उत्कृष्ट उद्योगपती म्हणून श्री अनिल गोमकाळे, अतुलनीय वैद्यकीय सेवे बाबत डॉक्टर सचिन चिंचे, आदर्श शिक्षकांकरिता श्री धनंजय पकडे, आणि उत्कृष्ट शेतीसाठी श्री गोपाल उमेकर यांना वीरा विदर्भ गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वीरा फाउंडेशन ही सामाजिक संस्था असून या संस्थेने आतापर्यंत जनतेच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले आहे. ज्यामध्ये निशुल्क आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिर, गरिबांना ब्लॅंकेट्स वाटप, वृक्षारोपण, रुग्णसेवा, विद्यार्थी दत्तक योजना, मोफत चष्मे वाटप, मोतीया बिंदूंचे ऑपरेशन, अशा प्रकारचे उपक्रम राबवून संस्थेने जनमानसाच्या मनावर ठसा उमटवलेला आहे. म्हणूनच संपूर्ण तालुक्यामध्ये वीरा फाउंडेशन चा नावलौकिक आहे.
यावेळी विरा फाउंडेशनच्या संपूर्ण परिवारासहित शेकडो लोकांनी गर्दी केली होती या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता वीरा परिवाराचे सन्माननीय सदस्य संजयजी उपासे, निलेश पेठे, केवल तुमडाम, दत्ताजी धवड, गिरीश शेंडे,शेखरजी खरपुरीया, रमणजी मनकवडे, अविनाश अटकळे, जयश्रीताई बंड, रोशनीताई बाजनघाटे, दुर्गेश चौधरी, आकाश रंगारी, ऋषिकेश वानखेडे, मंथन ठाकरे, दिलीपजी वैद्य, कृष्णाजी ठाकरे, मंगेश टेकाडे,श्रविल मोहतकर, प्रशांतजी घाडगे, करिष्मा गौतम, प्रांजली खंडाते, भोजराजजी मोहरीया, वर्षाताई गजबे, निलेश वाघे, रियाज शेख, रवी गुजरकर, आदर्श तायवाडे, आनंदजी बंड, हरीश पेंदाम, भरत मसराम, उत्तमजी शेंडे, समीर मसराम, अतुल गिरडकर, अनिल धुर्वे, रवींद्र आहाके, विवेक मसराम, दिनेश चव्हाण, इत्यादी स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला साधक परिवाराचे सुनील गजबे यांनी केले तर संस्थेचे संस्थापक सचिव वृषभ वानखेडे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले व असेच प्रेम जिव्हाळ्या आपुलकी व आशीर्वाद फाउंडेशनच्या पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.