ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी संसदेत कायदा करा- दिगांबर डोंगरे
1.
काटोल येथील भारत मुक्ती मोर्चा वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रश्नाच्या संबंधी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती दिगांबर डोंगरे ओबीसी आघाडीचे नरेंद्र राऊत भारत मुक्ती मोर्चाचे नेते सारंग मनोहर यांच्या नेत्रुत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला स्थानिक पंचशील नगर काटोल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दिगांबर डोंगरे यांच्या हस्ते माल्यार्पन करून मोर्चाला सुरवात करण्यात आली हा मोर्चा पंचशील नगर येथून मार्केट मेन रोडने डॉ बाबासाहेब आंबेडकर.चौकात नेण्यात आला यामध्ये
१. ओबीसीनची जातिनिहाय जनगणना करावी २. ओबीसीच्या आरक्षणाला हाथ न लावता मराठ्यांना आरक्षण लागु करावे.
३. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा या मागन्याकरिता मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला संबोधित करताना दिगांबर डोंगरे म्हणाले मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल त्याकरिता संसदेत कायदा करावाअसे डोंगरे म्हणाले.
संचालन श्रीकांत गौरखेडे यांनी केले तर आभार राजकुमार मडके यांनी मानले. मोर्चाच्या यशस्वी करिता विवेक गायकवाड, शुद्धोधन गराडकर ,सारंग मनोहर, राजकुमार मडके, वासुदेव पाटील, रुपचन्द मडके, बबलू मडके, जिवक चन्द्रिकापुरे, कृष्णा. गवईकर ,पितांबर गायकवाड, रोशन गजभिये, नितिन गायकवाड, इन्गलेश्वर बागडे ,चुन्निलाल गौरखेडे ,गजानन पाटील ,राहुल मनोहर, पुष्पा देशभ्रतार, प्रधन्या डोंगरे, रश्मी येवले, कल्पना मडके, मनाक्शि रक्शित, अर्चना गायकवाड ,अर्चना पाटील, हरप्रिया भालेराव, रेखा मनोहर ,पूर्वा तायडे, भाग्यश्री तायडे ,चित्रा तायडे यांनी सहकार्य केले.