कृषीदूतांची ई- पीक पाहणीबाबत सावळी बु. येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन
1.
काटोल:- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय नागपूर येथील कृषीदूत अश्विनी चिमुरकर, हिमांसी खाडे, युगंधरा किरणापुरे, साक्षी ढोरे, आणि प्रतीक्षा भिलकर यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत काटोल तालुक्यातील सावळी (बु.) येथील शेतकऱ्यांना ई-पीक ॲप पाहणी बद्दल उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले.
२०२२-२०२३ या महसुली वर्षापासून सातबारावर पिकांची नोंदणी फक्त मोबाईल मध्ये ई-पिक पाहणी ॲपच्या माध्यमातून होते. ई-पिक बद्दल ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना सविस्तर माहिती व्हावी या अनुषंगाने कृषी दूतांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच ई-पीक पाहणी अँप इन्स्टॉल कसा करावा, ॲपवर नोंदणी कशी करावी, पिकाची माहिती कशी भरावी, याबद्दल शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. यावेळी गावातील शेतकरी महिला आणि पुरुष उपस्थित होते.
मागील काही दिवसांपूर्वी शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन ई-पीक पाहणी करण्यात आले असून परिणामी ऑनलाइनमुळे शेतकऱ्यांना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे. ऑनलाइन कामे करावी की, शेतीचे कामे करावे असाही प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.