सोलार एक्सप्लोसिव कंपनीमध्ये विस्फोटात नऊ कामगारांचा मृत्यू
बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोसिव कंपनी मध्ये सकाळी सुमारे नऊ वाजता वीस्पोटात नऊ कामगारांचा मृत्यू झाला. असून यात सहा महिलेसह तीन पुरुषांच्या समावेश आहे. युवराज चरडे रा. बाजारगाव , ओमेश्वर मचरिके रा. चाकडोह, मोसम पटले रा. पाचगाव जिल्हा भंडारा , मीना उईके रा. अंबाडा सोनक , आरती सहारे रा. कामठी श्वेताली मारबते रा. कन्नमवार, पुष्पा मानपुरे रा.शिराळा अमरावती , भाग्यश्री लोणारे रा. ब्रह्मपुरी , रुमिता उईके रा.ढगा , या विस्फोटात नऊ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोलार कंपनी ही एक्सप्लोसिव कंपनी असल्यामुळे बूस्टर प्लॅन मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याने यात काही कामगार गंभीर जखमी झाले आहे .यात मूर्तकांची संकेत वाढ होण्याची शक्यता आहे.