जिल्हा परिषद नागपुर ,उमेद व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणाचा पुनर्प्रयास उपक्रम काटोल येथील जिल्हा परिषद गव्हर्मेंट शाळा येथे संपन्न.

जिल्हा परिषद नागपुर ,उमेद व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणाचा पुनर्प्रयास उपक्रम काटोल येथील जिल्हा परिषद गव्हर्मेंट शाळा येथे  संपन्न.

     तालुका प्रतिनिधी:- मयुर बी कुमरे

BPS LIVE NEWS NETWORK, DELHI

शिक्षणाचा पुनर्प्रयास उपक्रम काटोलमधे संपन्न.... पं.स चे सभापती संजय डांगोरे यांचे हस्ते उद्घाटन.

काटोल:- जिल्हा परिषद नागपुर ,उमेद व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणाचा पुनर्प्रयास उपक्रम काटोल येथील जिल्हा परिषद गव्हर्मेंट शाळा येथे नुकताच संपन्न झाला.यावेळी गणित ,विज्ञान ,इंग्रजी विषयाचे संदर्भात प्रदर्शनी आणि चर्चा,मार्गदर्षन करण्यात आले. शिक्षणाचा पुनर्प्रयास उपक्रम अंतर्गत महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने गणित ,विज्ञान ,आणि इंग्रजीच्या या मेळाव्याला तालुक्यातील परिक्षार्थी महिलांची फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या या मेळाव्याचे उद्घाटन काटोल पंचायत समितीचे सभापती संजयभाऊ डांगोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती धम्मपाल खोब्रागडे, गटशिक्षणाधिकारी सोनटक्के सर पं स. काटोल ,विस्तार अधिकारी नरेश भोयर, प्रोग्राम समन्वयक श्री नरेंद्रजी लांजेवार होते.

       

कार्यक्रमाचे संचालन प्रगती शिंदे यांनी केले. सौ राणीताई गिरडकर, नितीन दोरवे, अनिता सहस्त्रबुधद्दे, मयुर साठवणे, कामिनी फुले, मृणाली फुलके, मोनाली कोटजावळे, योगेश ढोबळे,श्री राउत सर तथा शाळेचे सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी केला