नायगाव जुने शाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश.
श्रीरामपूर - तालुक्यातील नायगाव जुने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरिय व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळविले आहे. अनिल इन्द्रभान गायकवाड (इ.३री) याने केंद्रस्तरिय क्रीडा स्पर्धेत लहान गट मुले उंच उडी व धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच त्याने उंच उडी स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकाविला. कु. समिक्षा सुभाष तुपे ( इ.४थी) हिने लहान गट मुली लांब उडी स्पर्धेत केंद्रात तिसरा क्रमांक तर कु. पुजा रमेश भवार (इ.४थी) हिने लहान गट मुली धावणे स्पर्धेत केंद्रात तिसरा क्रमांक पटकाविला.या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा माता पालक मेळाव्यात सरपंच राजाराम राशिनकर,बापूसाहेब लांडे, संपतनाना लांडे, आरोग्यामित्र सुभाष गायकवाड, प्रमोद शेजुळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश लांडे, पोलीस पाटील राजेंद्र राशिनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येवून प्रोत्साहन दिले. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे व शिक्षिका सुजाता सोळसे यांचे मार्गदर्शन लाभले. Delhi91 Bps Live News Reporter Deepak Kadam Shrirampur.