खापरखेडा पत्रकार संघ व फिनिक्स करिअर अकादमी कोराडी तर्फे सामाजिक कार्यकर्ता हितेश बनसोड यांचे सत्कार करण्यात आले .

खापरखेडा पत्रकार संघ व फिनिक्स करिअर अकादमी कोराडी तर्फे सामाजिक कार्यकर्ता हितेश बनसोड यांचे सत्कार करण्यात आले .

ब्यूरो रिपोर्टर वाहिदशेख 

(बीपीएस लाइव न्यूज नेटवर्क )

सावनेर तालुका : 2 अक्टूबर गांधी जयंती निमित्त नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न खापरखेड़ा पत्रकार संघ व फिनिक्स करिअर अकादमी कोराडी यांचा संयुक्त विद्यमाने चीचोली व वलनी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन मनोरंजन गृह क्रमांक - 2 प्रकाश नगर वसाहत खापरखेडा येथे करण्यात आले. 

सदर कार्यक्रमात सावनेर शहरातील गाजलेला व मतिमंद , बेवारस , मनोरुग्ण यांचा नाथ म्हणूंन ओळखणारा सामाजिक कार्यकर्ता हितेश बंसोड यांचा सदर संघटने तर्फे सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक नितेश कराळे सर (वर्धा) असून फिनिक्स करियर अकादमी कोराडीचे संचालक प्राध्यापक प्रदीप कमाले यांचे संपूर्ण टीम ह्या कार्यक्रमात उपस्थित होते .

त्याच बरोबर खापरखेडा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जालंदर , 

उपाध्यक्ष प्रकाश गजभिये , कार्याध्यक्ष केशव पानतावणे , सरचिटणीस कपिल वानखेडे , कोषाध्यक्ष डॉ. विनोद गौतम आणि खापरखेडा पत्रकार संघाचे संपूर्ण पदाधिकारी , सभासद , सदस्य व चीचोली आणि वलनी परिसरातील असंख्य विद्यार्थी ह्या मार्गदर्शन कार्यशाळेत उपस्थित होते .