सावनेर येथील प्रसिद्ध "दुर्गा माता मंदिर " जुना धान्यगंज येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावली हजेरी !!
सावनेर येथील प्रसिद्ध "दुर्गा माता मंदिर " जुना धान्यगंज येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावली हजेरी !!
बीपीएस न्यूज नेटवर्क
ब्यूरो रिपोर्टर - वाहिद शेख
सावनेर : यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 26 सप्टेंबर 2022 पासून सुरु झालेला आहे. नवरात्रीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीचे भक्त तिची पूजा करण्यासाठी वर्षभर शारदीय नवरात्रीची वाट पाहत असतात. पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे , जे 05 ऑक्टोबर 2022 पर्यंत साजरे केले जाईल. नवरात्रीच्या काळात अनेक जण उपवास करतात आणि देवीची पूजा करतात. याशिवाय अनेकांच्या घरी घटस्थापना देखील होते. काही मंदिरातदेखील घट मांडण्याची व्यवस्था केली जाते.
त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरामधे जुना धान्यगंज येथील प्रख्यात दुर्गा माता मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा नवरात्र निमित्त विविध कार्यक्रम करण्यात आले . सदर कार्यक्रमात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुना धान्यगंज येथील दुर्गा माता मंदिरात हजेरी लावली . दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांचा हस्ते पुजा अर्चना करण्यात आली . यावेळी त्यांचा सोबत भाजप नेते सोनबाजी मुसळे , रामराव मोवाडे , मंदार मंगळे , इत्यादि नेते व कारयकर्ते प्रामुख्याने उपस्थीत होते.
मंदीर समिती तर्फे प्रा. कमल भारव्दाज यांचा द्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना शॉल-श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला . तसेच दुर्गा माता मंदीर समोरील समस्या बाबत निवेदन देण्यात आले . या प्रसंगी दुर्गा माता मंदीर समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे कार्य केले असून यावेळी राजेश भारदाज , मनोज गुप्ता , अरुण रुशीया ,गणेश बागडे , नारायन पारवे , बागडे सर , किशोर दहिकर व मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थीती होती.