*सावनेर पंचायत समिती समोर उपोषणाला बसले रोजगार सेवक*
1995
1.
सावनेर पंचायत समिती समोर उपोषणाला बसले रोजगार सेवक* बी पी एस लाईव्ह न्युज नेटवर्क सावनेर:-तहसील सावनेर कार्यालय मध्ये ग्राम रोजगार सेवक यांनी एकत्र येऊन तहसीलदार प्रताप वाघमारे , बी डी ओ दिपक गरुड यांना सदर निवेदन देण्यात आले. ग्राम रोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्या
असे आवाहन ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने शासन दरबारी निवेदन दिले व एक दिवस उपोषण केलं असून ग्राम रोजगार सेवकाना प्रमुख मागण्या १)अधंवेळ शासन निर्णय पूर्णवेळ करुन ग्राम रोजगार सेवकांना शासनकिय शेवेत समाविष्ट करावा. २) ग्रामरोजगार सेवक यांना निश्चित मानधन देऊन ते त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात यावे . ३) विमा कवच लागु करावा. ४) रोजगार सेवक यांना पदावरून काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतला न देता सीईओ सरांना द्यावा. ५) मजुरांचे आँनलाईन हजेरी घेण्यासाठी रिचार्ज सह मोबाईल देण्यात यावा व सदर आमच्या मागण्यावर विचार करून आम्हाला न्याय देण्यात यावा अशा प्रकारे रोजगार सेवक यांनी आपली भूमिका स्पष्ट रीत्या मांडली व उपोषणाला बसले रोजगार सेवक यांनी सुमारे ५ वाजता नारळ पाणी पिउन उपोषण सोडले.