*शंकरराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी शाळेत चिंतन दिवस साजरा*
खापरखेडा
*शंकरराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी शाळेत चिंतन दिवस साजरा* BPSLIVE NEWS NETWORK नागपूर:-22 फेब्रूवारी रोजी स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांची जयंती असून या दोघांचा वाढदिवस जागतिक चिंतन दिवस म्हणून संपूर्ण जनभरातील स्काउट्स गाईड्स मोठ्या हर्षोउत्साहाने साजरा करतात . स्काऊट गाईड ही संकल्पना एका मोठ्या चळवळीच्या रूपात भारतासहित संपूर्ण जगातील जवळपास दोनशे सोळा देशात अतिसक्रियतेने
राबविली जाते. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक, व्यावसायिक , आध्यात्मिक, सार्वजनिक , सामाजिक, नैसर्गिक स्वरुपात मिळणारे लाभ पाहता स्काऊट गाईड ही चळवळ व्यापकतेने जगप्रसिद्ध झाली आहे. शंकरराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी शाळेचे कब, बुलबुल, स्काऊट आणि गाईडच्या यूनिटने शाळेच्या
परिसरात स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांची जयंती उत्साहाने साजरी करून जागतिक चिंतन दिवसाच्या सर्वाना हार्दिक शुभेछ्या दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका तथा ग्रुप लीडर राधा मोहरील यांनी लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या फ़ोटोला स्कार्फ वोगल घालून व केक कापुन त्यांचा वाढदिवस साजरा केला, सोबतच स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या जागतिक मुल्यांचे सर्वांनी जतन व अनुकरण करून स्काऊट गाईड ही चळवळ भारताच्या कानाकोपऱ्यात सक्रियतेने प्रसारित व्हावी, अशे मनोगत व्यक्त केले. स्काऊट गाईडच्या प्रथम सोपान परीक्षा मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त हर्षदा वाघ, द्वितीय क्रमांक प्राप्त माही बारापात्रे आणि तृतीय क्रमांक प्राप्त खुशी मानकर या तिनही गाईडचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून मुख्याध्यापिका यांनी सत्कार केला. या कार्यक्रमात शाळेचे स्काउट मास्टर शेखऱ कोलते, गाईड कॅप्टन अनिता ठाकरे, गाईड कॅप्टन अनिता सोंगेरवा आणि सर्व शिक्षिकगण उपस्थित होते .