डॉ. ज्योतीताई मेटे यांनी शेवगाव भातकुडगाव येथील नवरात्र निमित्त चालू असलेल्या सप्ताह निमित्त भेट व कार्यकर्त्यांशी साधला संवाद.
डॉ. ज्योतीताई मेटे यांनी शेवगाव भातकुडगाव येथील नवरात्र निमित्त चालू असलेल्या सप्ताह निमित्त भेट व कार्यकर्त्यांशी साधला सवांद.
शेवगाव प्रतिनिधी-यशवंत पाटेकर
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका व कुकाना, भातकुडगाव, या गावांमध्ये जाऊन शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा डॉ.ज्योतीताई मेटे यांनी संवाद साधला व भातकुडगाव या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त चालू असलेल्या सप्ताह कार्यक्रमाला भेट दिली व बोलताना ज्योतीताई म्हणाल्या मेटे साहेबांचें कार्य आपल्याला चालू ठेवायचे आहे गोरगरीब शोषित पीडित अल्पभूधारक गरजू नागरिकांना न्याय देण्याचे काम करायचे आहे मराठा आरक्षणासंदर्भात आपल्याला हा लढा चालूच ठेवून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी आमच्याशी अवश्य संपर्क साधा आम्ही नक्कीच आपले प्रश्न सोडवू आपण शिवसंग्राम पक्षाची चळवळ थांबवणार नाही कार्यकर्त्यांना उणीव भासू देणार नाही मेटे साहेब जरी आज नसले तरी त्यांचे स्वप्न नक्कीच आपण साकार करणार आहोत आणि त्यांचा लढा पुढे घेऊन जाणार आहोत असे डॉ ज्योतीताई मेटेय म्हणाल्या या कार्यक्रम प्रसंगी शिवसंग्राम शेवगाव तालुका अध्यक्ष नवनाथ भाऊ इसरवाडे यांनी ज्योतीताई मेटे यांचे स्वागत केले व भातकुडगाव येथे नवरात्र सप्ताहाला भेट दिल्यानंतर सप्ताहाचे आयोजक श्री चंदू भाऊ फटांगरे व त्यांच्या पत्नी आनीताताई फटांगरे यांनी त्यांचे स्वागत करून कार्यक्रमास भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले मनीषा ताई लव्हाळे यांनी सर्व उपस्थित महिला व डॉक्टर मेटेताई त्यांचे स्वागत केले याप्रसंगीनवनाथ भाऊ इसरवाडे, संदीपराव बामदळे .हर्षदा काकडे बाळासाहेब जाधव यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी नितीन लाटकर, बबनराव माने, विनोद कवडे ,बाळासाहेब जाधव, आकाश जाधव, शिवसंग्राम चे जिल्हा सरचिटणीस संदीपराव बामदळे, नेवासा तालुका अध्यक्ष श्याम भाऊ ढोकणे, शेवगाव शहराध्यक्ष अशोकराव कुसळकर, राजू लांडे, अजय परदेशी, कानिफनाथ धुमाळ ,बाबासाहेब गरड, शेवगाव तालुका उपाध्यक्ष चंदू भाऊ फटांगरे ,लक्ष्मण लव्हाळे, तुकाराम लव्हाळे, राजेश फटांगरे ,हर्षदा ताई काकडे
लक्ष्मण लोढे, शंकर लोंढे. राधेश्याम महाराज बोरुडे, शहराम आगळे ,भुसे गुरुजी, विकास गटकळ हरिश्चंद्र जाधव आदी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.