पत्रकार सुनील सोंमकुवर यांनी घेतला अखेरचा श्वास . निधन वार्ता

पत्रकार सुनील सोंमकुवर यांनी घेतला अखेरचा श्वास . निधन वार्ता

 निधन वार्ता 

(दिनांक 20 मे .) नागपूर (महाराष्ट्र)

BPS Live Digital नागपूर जिल्हा प्रतिनिधी व व्हॉइस ऑफ मीडिया चे सदस्य पत्रकार - सुनिल सोमकुवर* रा.भागेमाहेरी ता. सावनेर जि. नागपूर यांचे आज दि. २० मे रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास दुःखद निधन झाले. सोमकुवर

यांचा दि. १४ मे रविवारी रोजी दु. १२ वा. च्या सुमारास सावनेर ते कोंढाळी प्रवासामध्ये अपघात झाल्यामुळे त्यांना तात्काळ मेडिकल कॉलेज नागपूर येथील रुग्णाल्यात दाखल करण्यात आले होते. सोमकुवर यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मेडिकल येथील ट्रामा सेंटर मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती पण अखेर मृत्यूशी झुंज देतांनी सोमकुवर यांची प्राण ज्योत मावळली 

 सुनिल सोमकुवर हे कुटुंबातील एकुलता एक कमविणारा मुलगा असून तो आपल्या मनोरुग्ण वयोवृद्ध आई इंदूबाई सोबत भागेमाहेरी या गावामध्ये राहत होते. सुनिल हे २ महिन्याचे असतांनीच वडीलांनी या माय लेकांची साथ सोडत आपला वेगळा संसार थाटण्यास निघून गेले होते. सोमकुवर यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे ते पीडित लोकांचे अडलेले कामे करून देऊन आपला कसा बसा उदर्निवाह करायचे मुलाच्या मुर्त्यूची बातमी मिळताच आईची काय अवस्था होणार आई दुःखातून बाहेर निघणार की नाही. ही बातमी मिळताच तालुक्यातील पत्रकार बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे.

Delhi91 bps live news आणि voice of midia तसेच राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ तर्फे सुनील सोंकुवर यांना भावपूर्ण श्रद्धांजली .