सावनेर येथे संत शिरोमणी रविदास जयंती सोहळा आयोजित करण्यात आले.
सावनेर येथे संत शिरोमणी रविदास जयंती सोहळा आयोजित करण्यात आले.
सावनेर (दि.26 फेब्रुवारी) माणूस मोठा किंवा लहान हा जन्माने नाही तर कर्तृत्वाने बनतो हा संदेश संत रविदासांनी आपल्या ज्ञानाने समाजाला दिला.
निर्गुण भक्ती शाखेचे महान कवी आणि संत, शिरोमणी संत रविदास हे अशा महापुरुषांपैकी एक आहेत ज्यांनी समाजाची दिशा बदलली.
मानवतावाद, स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची बिजे रोवत मानवी कल्याणासाठी समाजवादाची तुतारी फुंकणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 647 वी जयंतीनिमित्त 25 फेब्रुवारीला सावनेर येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाजाचे ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक व राजनीतिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन रश्मीताई बर्वे (माजी जि.प. अध्यक्ष ) यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहरभाऊ कुंभारे (माजी जि.प.उपाध्यक्ष ) होते .
प्रमुख अतिथी पवन जैसवाल, उत्तम कापसे ,अरविंद लोधी , डोमासाव सावजी , प्रभाकर इंगळे, सुधाकर तीबोले , गोपाल घटे , प्रशांत ठाकरे ,दिलावर शेख ,संतोष सोंनबरसे , अशोक छत्रे , नरेश मछले ,श्रीमती रमाबाई वंजारी , ज्योतीताई मछले , बिना छत्रे , मायाबाई छत्रे , नर्मदाबाई सोनेकर , उर्मिलाबाई पहाडे , राजु खांडे, गेंदलाल कमाले, रामप्रसाद कनोजिया , राजू छत्रे , श्यामराव छत्रे , रमेश छत्रे , धनराज छत्रे , डॉ.सोणेकर , भगवान चांदेकर , यांनी आपली दर्शिविली .
तसेच सावनेर तालुका चर्मकार कमिटी अध्यक्ष - सुभाष मछले.
सावनेर शहर संत शिरोमणी अध्यक्ष - देवेंद्र छत्रे , उपाध्यक्ष-अनुप पठाणे , सचिव - राजेंद्र चवडे, कोषाध्यक्ष नित्यानंद कोलते , सहसचिव - उमेश मछले, नरेश छत्रे , मंगलू बघेल , नरेश सोंनबरसे, विकास छत्रे आणि संपूर्ण चर्मकार समाज बांधव- भगिनी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .