जागतिक महिला दिवस पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला .

जागतिक महिला दिवस  पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला .

जागतिक महिला दिवस पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला.

 Bps news network 

ब्युरो रिपोर्टर - वाहिद शेख

सावनेर : आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. यादिवशी, वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचे योगदान लक्षात घेऊन त्यांचा गौरव केला जातो. महिलांशी संबंधित विशेष मुद्दे घेऊन त्यावर काम करणे आणि त्यांच्या हक्कांबद्दल बोलणे हा महिलांच्या दिवसाचा हेतू आहे. दरवर्षी यासाठी विशेष थीम देखील निवडली जाते.

जागतिक महिला दिन देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. कार्यालयांमध्ये बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात , महिलांबद्दल आदर, अभिमान, सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. तसेच महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून आनंदात साजरा केला जातो.

 त्याअनुषंगाने सावनेर स्थित तेली समाज महिला मंडळ यांच्यावतीने सावनेर पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला .

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन सावनेर येथील महिला पोलीस अधिकारी तसेच महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला . सदर कार्यक्रमात ठाणेदार मारुती मुळक यांची प्रमुख उपस्थिती असून महिला पोलीस अधिकारी , कर्मचारी यांच्या हस्ते केक कापून जांगतिक महिला दिवस साजरा करण्यात आला . महिलांनी देशाच्या प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अनके यशस्वी व्यक्तींच्या जीवनामध्ये स्त्रियांचा मोलाचा वाटा असतो. प्रत्येक महिलांसाठी हा दिवस आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असतो. अशा प्रकारे तेली समाज महिला मंडळ यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना संबोधित आणि मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी सौ. अनिता सुरकार, वैशाली गोपाल घटे, कविता पिसे , प्रेरणा अंतुरकर, शुभांगी उमाटे, वैशाली पाटील, सोनाली उमाटे, वैशाली प्रदीप घटे, वैभवी तपासे, मेघा घटे, स्नेहल पाटील, श्रद्धा देशमुख, स्नेहल सुरकार, चेतना घटे, सुचिता देशमुख यांच्यावतीने महिला अधिकारी , कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला व पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन कार्यक्रम यशस्वीरित्या शांततेनं पार पाटण्यात आला .यासोबत सदर कार्यक्रमात ठाणेदार मारुती मुळक , पत्रकार बंधू , सामाजिक कार्यकर्ते जिजाबाई तातोडे आणि समस्त महिला पोलिस अधिकारी , कर्मचारीवर्ग इत्यादि उपस्थित होते.