जय हनुमान क्रिडा मंडळाचा खेळाडू परवेज शेख महाराष्ट्र संघात
जय हनुमान क्रिडा मंडळाचा खेळाडू परवेज शेख महाराष्ट्र संघात.
[निवडीबद्दल विविधक्षेत्रातुन होत आहे शुभेच्छांचा वर्षाव]
dhelhi91bpslive news network
नागपूर: (दि.13 मार्च) माणसाला जगात काही वेगळे करायचे असलेतर त्याला एकाग्र मन आणि भरघोस जिद्द असायलाच हवी तरच तो आपला भविष्य सुवर्ण करू शकतो. अशाच एक मुलगा पाटोदा शहरापासून हक्केच्या अंतरावर असलेल्या महासांगवी येथील हनुमान क्रिडा मंडळाच्या शेकडो खेळाडूंनी आतापर्यंत कबड्डी,कुस्ती,खोखो आदी खेळाच्या माध्यमातून राज्यस्तरावर मजल मारली असुन ह्या गावात वंजारी समाज बहुसंख्येने असुनही एका मुस्लिम समाजाच्या चहावाल्याच्या नातुला जय हनुमान क्रिडा मंडळाने कबड्डी खेळण्याची संधी दिली त्या संधीचं सोनं करीत शेख परवेझ यांने जय हनुमान क्रिडा मंडळाचे अध्यक्ष मा.आनंद गर्जे, मा.मधुकर (तात्या) गर्जे व प्रशिक्षक मा.प्रमोद गर्जे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने त्याची ३३ व्या किशोर गटातुन कबड्डी या खेळात महाराष्ट्र संघात निवडीवर शिक्कामोर्तब केला असुन त्याच्या निवडीबद्दल विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पाटोदा शहरातील रहिवासी शेख शब्बीर भाई चहाचा व्यवसाय करतात तर शेख परवेझ यांचे वडील बँकेचे पिग्मी एजंट म्हणून काम करतात आर्थिक परिस्थिती बेताची शालेय जिवनातच शेख परवेझ याला कबड्डी खेळ आवडु लागल्याने त्यांचे वडील शेख असलम यांनी महासांगवी येथील जय हनुमान क्रिडा मंडळात प्रशिक्षणासाठी पाठविले असता तेथे मा.मधुकर (तात्या) गर्जे व प्रशिक्षक मा.प्रमोद गर्जे सर यांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्याने शेख परवेझ यांने विविध स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली लोकसेवा प्रतिष्ठान, ता.हवेली जिल्हा पुणे यांच्यावतीने ३४वी किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दि.२४ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा,फुलगाल ता.हवेली जि.पुणे येथे संपन्न झाली या निवड स्पर्धेत शेख परवेझ याने चमकदार कामगिरी केल्याने भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने दि.१६ मार्च ते १९ मार्च २०२४ या कालावधीत ३३ वी किशोर गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा मोतीहरी,चंम्पारन बिहार येथे आयोजित स्पर्धेत शेख परवेझ याची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल शेख परवेझ यांचे जय हनुमान क्रिडा मंडळाचे अध्यक्ष मा.आनंद गर्जे मा. मधुकर गर्जे,मा.जि.प.सभापती महेंद्र गर्जे,प्रशिक्षक प्रमोद गर्जे सर,तसेच सहकारी खेळाडुंनी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते रामकृष्ण बांगर,.जि.प.मा.अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला,पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजु जाधव,युवानेते विजयसिंह बाळा बांगर,सय्यद शहानवाज, योगेश सानप आदींसह तालुक्यातील राजकीय, सामाजिक, व्यापारी, डॉक्टर, वकील, शिक्षक,पत्रकार आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.