महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2024 करिता समाजसेवी सौ. शितल पाटील यांची निवड .
महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2024 करिता समाजसेवी सौ. शितल पाटील यांची निवड .
=====================================
नाशिक येथे 19 ऑगस्ट रोजी होणार गौरव.
=====================================
नागपूर : (दि.16 ऑगस्ट) शहराच्याच्या प्रसिद्ध समाजसेवी सौ शितल पाटील यांची लाईफब्लूम इंडिया संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या "महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2024" करिता निवड झाल्याने स्वयंसेवी संस्था परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
लाईफब्लूम इंडिया संस्थेच्या वतीने नाशिक येथे राष्ट्रीय स्तरीय भव्य संमेलनात हा विशेष पुरस्कार देऊन सौ शितल पाटील यांचा गौरव होणार आहे. राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना 19 ऑगस्ट रोजी "महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2024" पुरस्काराच्या रूपात सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल देऊन सामाजिक, राजकीय व कृषी क्षेत्रातील मान्यवारांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सौ शितल पाटील ह्या संस्थापक अध्यक्ष असून कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फॉउंडेशन नवी दिल्ली अंतर्गत नागपूर जिल्हास्तरावरील त्या दायित्व सांभाळतात.
बाल विवाह मुक्त भारत अभियान तथा बाल लैंगिक शोषण, बाल मजुरी तथा बाल तस्करी व महिला सक्षमीकरण साठी त्या नेहमी कार्यरत आहेत. तसेच बाल कल्याण समिती येथे सौ. शीतल पाटील स्पोर्ट पर्सन म्हणून कार्यरत आहेत. *"महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2024"* हा राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार मिळाल्याने आमच्या संस्थेवरील जबाबदारी वाढलेली असून महिमा NGO केवळ महिला व बाल विकासा करिताच नव्हे तर याक्षेत्रात भरीव कामगिरी घडून येण्यासाठी सदैव प्रयत्नरत राहणार आहे असे विचार समाजसेवी सौ. शितल पाटील यांनी संवादाता वाहिद शेख यांच्याशी चर्चा करतांना व्यक्त केले .