चालक दिनानिमित्त सर्व चालकांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले .

चालक दिनानिमित्त सर्व चालकांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले .

चालक दिनानिमित्त सर्व चालकाचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

------------------------------------------------------------------------

Bpslivenews network 

सावनेर :(18 सप्टेंबर) चालकांचे परिवहन क्षेत्रात किती महत्त्वाचे काम आहे, हे कोरोना काळात अधोरेखित झाल्याने त्यांना विसरता येणार नाही. त्यामुळे वाहनचालकांचा सन्मान व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी १७ सप्टेंंबर हा ‘चालक दिवस’ म्हणून साजरा करण्यात येते. चालकांना समाजात अधिक मान-सन्मान मिळाला पाहिजे. म्हणून सहा.पोलीस निरीक्षक विजय मुसनवर (महामार्ग पोलिस) यांनी बस स्थानक सावनेर व विविध ठिकाणी हजेरी लावली . व तेथील चालकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छाही दिल्या .

17 सप्टेंबर रोजी असा चालकदिवस पाळण्याची आवश्यकता असल्याचे सहा. पोलीस निरीक्षक विजय मुसनवार महामार्ग पोलीस मदद केंद्र पाटणसावंगी , कॅम्प पारडी , हेटी येथे म्हणाले.

चालकदिना निम्मित महामार्ग सहा. पोलीस निरीक्षक विजय मुसनवार यांनी चालकांना शुभेच्छा दिल्या तसेच सुरक्षित वाहन चालवून वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा असे मत त्यांनी महामार्ग कार्यालयात पाटणसावंगी कॅम्प पारडी हेटी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमा दरम्यान व्यक्त केले . 

चालक दिनानिमित्त हितज्योती आधार फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते हितेश दादा बनसोड हे सुद्धा उपास्थित होते. हितेश दादा बनसोड यांनी सुद्धा वाहनचालकांना शुभेच्छा देऊन अपघातवेळी पीडिताना मदत करावी आणि वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन केले. सर्वांनी प्रामाणिक पणे नियमांचे पालन केल्यास अपघात निश्चितच कमी होईल अशी आशा त्यानी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली.यावेळी सदर कार्यक्रमांस महामार्ग पोलीस अंमलदार Asi शरद चौधरी , HC मनोज सावरकर , Npc सतीश ठाकरे , महिला अंमलदार अश्विनी मेश्राम , चालक दीपक पाथोडे व अंमलदार अंकित ठाकरे आणि हितज्योती आधार फाऊंडेशनची संपूर्ण टीम तसेच असंख्य वाहनचालकही उपस्थित होते .