*स्काऊटचे राष्ट्रपति पुरस्कार पूर्व परीक्षा शिबिर रामटेक येथे संपन्न !!!
BPS-Live News -सुनील सोमकुवर
पारशिवनी :- भारत स्काउऊट्स आणि गाईड्स अंतर्गत 3 ते 7 जानेवारी 2022
या कालावधीत आयोजित स्काऊटचे राष्ट्रपति पुरस्कार पूर्व परीक्षा शिबिर राज्य प्रशिक्षण केंद्र नागार्जुन रामटेक येथे यशस्वीरित्या संपन्न झाले.
स्काऊटचे राष्ट्रपति पुरस्कार पूर्व परीक्षा शिबिर मध्ये अमरावती , नागपुर , गोंदिया, यवतमाळ, अकोला, वाशिम ,बुलढाणा येथील एकूण 43 स्काऊट्स उपस्थित होते. या पूर्व परीक्षा शिबिर मध्ये स्काऊट्सची लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.
या पूर्व परीक्षा शिबिर मध्ये शिबिर प्रमुख आणि राज्य प्रशिक्षण आयुक्त गिरीश कांबळे , निरीक्षक मानसिंगभाई चौधरी , मुख्य परीक्षक मनोहरभाई ठक्कर, शिबिर सहायक संजय रामावत, अमरावतीचे जिल्हा संघटक रमेश जाधव , चंद्रपुर चे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त संजय उइके आणि शेखऱ कोलते सहित अन्य स्काऊट मास्टर सुद्धा उपस्थित होते.