अहिल्यादेवी होळकर यांची १२८वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली*
*अहिल्यादेवी होळकर यांची १२८वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली* सावनेर: महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ नागपूर जिल्हा आणि सावनेर तालुका संयुक्त विद्यमाने सावनेर पंचायत समिती सभागृह येथे आयोजन करण्यात आले. 26 ऑगस्ट 2022 शुक्रवारी सकाळी 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२८वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात शांत वातावरणात
साजरी करण्यात आली तसेच या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रा.बाबा टेकाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अजय चांदखेडे, सावनेर पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश प्रराते,प.स. सदस्य गणेश काकडे धनगर समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष राजूभक्ते, टेंभुरडोह ग्रामपंचायतचे उपसरपंच मोरेश्वर चवनारे व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते . राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पूजा -माल्याअर्पण आणि दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली व मान्यवरांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय
भाषणात महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रा.बाबा टेकाडे यांनी अध्यक्षीय भाषण राजमाता अहिल्यादेवी उत्कृष्ट प्रशासक आणि संघटक होत्या इदुर मधील त्याचा राज्य कार्यकाळात सुमारे ३० वर्ष चालला तो स्वप्नावत काळ जनतेच्या भरभराटिचा होता शिवाजी महाराज जसे पूरजा मद्धे उत्तर राज्य होते तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी हि स्त्रीया मंधील उत्तम राजकीर्ती होती अल्पवधीन रयतेचे मन जिंकले ते पुढे म्हणाले सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने जागोजागी विहिरीही खोदल्या, विविध मंदिरांचा जीर्णोद्धार केला प्रवासी निवास आश्रम शाळा, अन्नदान शाळां उभारल्या यामुळे जनता सुखी होती. विषेश म्हणजे अहिल्यादेवी एक समाजसेवी महिला असून नेहमी स्त्रियां साठी एक आदर्श होत्या . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विजय टेकाडे यांनी केले संचालन शरद नांदूरकर यांनी केले तसेच प्रोमोद डाखोळे यानी आभार मानले .