दागिने पोलिसांमुळे परत मिळाले
शेवगाव:-हरवलेले 2 लाख 10 हजाराची सोन्याचे दागिने पोलिसांच्या प्रयत्नांमुळे संबंधितास पुन्हा मिळाले. दागिने मिळवून दिल्याबद्दल येरणगाव ग्रामस्थांतर्फे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील व पोलीस कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.
एरंडगाव समसुद ( ता. शेवगाव )येथील सागर संतराम भुसारी यांनी पतसंस्थेत गहाण ठेवलेले नेकलेस व गंठण असे दोन लाख दहा हजाराचे सोन्याचे दागिने बुधवारी (ता. 30) सोडून घेतले. त्यानंतर पाथर्डी रस्त्यावरील एका जूस सेंटर मध्ये कुटुंबीयांसमवेत ज्यूस पिण्यासाठी गेले मात्र दागिने ची पिशवी तेथेच विसरून ते गावी गेले. घरी गेल्यानंतर दागिने ज्युस सेंटर मध्येच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित दुकानात धाव घेतली मात्र तोपर्यंत पिशवी कोणीतरी नेली होती. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले असता सहाय्यक फौजदार बी बि ताके.अण्णा पवार .अभय लबडे. अशोक लीपने. प्रियंका शिरसाट. यांनी दुकानातील सीसीटीव्ही तिची तपासणी केली. दागिने ची पिशवी घेऊन जाणाऱ्या महिलेचा शोध घेतला. मळेगाव (ता. शेवगाव) येथील या महिलेने दागिनेची पिशवी सापडल्याचे कबूल करीत पोलिसांकडे सुपूर्द केली. पोलिसांनी भुसारी यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडे दागिने सुपूर्त केले. एरंडगाव चे (सरपंच संतोष धस) यांनी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील .यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. राजेंद्र धस .संदीप धस. बंडोपंत गवळी. बंडू निकम. अनिल धस. उपस्थित होते.